आफ्रिकेतली सौंदर्यवती
आफ्रिकन सुंदरीनी विश्वसुंदरी स्पर्धेत प्रथम विजयश्री प्राप्त केली १९५४ साली. त्यावर्षी इजिप्तच्या अॅंटीगॉनने सुंदरी पद पटकावले. १९५८ ला सादर झालेल्या स्पर्धेत पेनीलोप नावाच्या दक्षिण आफ्रिकेच्या सुंदरीने चषक पटकावला. १९७४ साली स्पर्धेत नाट्य घडले. हेलन मॉर्गन या ब्रिटीश सुंदरीला मुकुट मिळाला. चार दिवसांनंतर समजले, तिला अठरा महिन्याचा मुलगा होता. ‘आई’ असल्याचे समजल्यावर तिला राजीनामा द्यावा लागला. […]