नवीन लेखन...

अन्नपूर्णा देवीची गोष्ट

फार फार वर्षांपूर्वी आकाशाच्याही वर तोका आमाहारा येथे विश्व निर्मात्याचे घर होते. त्याकाळी ‘अमेनो मिनाकानुसि’ नावाच्या देवाचा सर्वत्र संचार होता. ‘अमेनो मिनाकानुसि’ या देवाने अनेक देव-देवता निर्माण केल्या. या देवी-देवतांमध्ये ‘इजानागि’ आणि ‘इजानामि’ या दोन देवी देवतांचाही समावेश होता. […]

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि त्यांचे छिन्नविच्छिन्न शिल्प

उन्मादाच्या नशेत झिंगून आपल्या विकृतीचे भयंकर प्रदर्शन करताना , मांडलेले थैमान सर्वांना भयकंपित करणारे होते . विच्छिन्न झालेले ते शिल्प पाहताना यातनांनी तडफडणाऱ्या आपल्या आत्म्याला किती भयंकर क्लेश झाले असतील याची कल्पना सुध्दा करता येत नाही . […]

माय तुहे किती आठव आठवू…

माय तुहे किती आठव आठवू… आईच्या कष्टप्रद भोगवट्याचं यथार्थ प्रतिबिंब परीक्षण – डॉ.धोंडोपंत मानवतकर ” माय तुहे किती आठव आठवू ” ही आईच्या कर्तव्यस्मृतींचा भावबंध रेखाटलेली सुंदर काव्याकृती डॉ.सर्जेराव जिगे यांच्या सिद्धहस्त लेखनीतून साकारली आहे. डॉ.जिगे यांचे समकालीन असणारे ग्रामीण कवी, लेखक, वाचक यांना ती प्रातिनिधिक स्वरुपात आपल्याच आईची गाथा वाटेल…इतकी सहज सुंदर झालेली आहे. आईचे […]

दर्शनमात्रे मन कामनापूर्ती (गीत  गणेश)

समर्थ रामदास स्वामी हे खरे तर भगवान श्रीरामाचे उपासक आणि परमभक्त. असे सांगतात की, समर्थ रामदास स्वामी हे पुणे जिल्ह्यातील मोरगाव या गणेशस्थानी गेले असता गणपतीच्या दर्शनानंतर त्यांनी ही आरती लिहिली. […]

शंख व त्याचे हिंदू धर्मातील महत्व

शंखाचे अनेक प्रकार आहेत. पण शास्त्रानुसार वामावर्ती आणि दक्षिणावर्ती शंख हे सर्वात महत्त्वाचे मानले जातात. शंख निर्मिती ही शंखचूर्णांच्या हाडांपासून होते असं मानलं जातं. तर त्यांची उत्पत्ती समुद्र मंथनादरम्यान झाली होती असंही मानलं जातं. हेच कारण आहे की, देवी लक्ष्मी आणि दक्षिणावर्ती शंख हे दोघे भाऊ-बहिण मानले जातात. शंख हा लक्ष्मीचा छोटा भाऊ समजला जातो. शंख हे समुद्र मंथनातून प्राप्त झालेले पाचवे रत्न आहे. […]

या चिमण्यांनो परत फिरा रे

(ओल्या मातीला आकार देणाऱ्या सर्व गुरुजनांना सादर समर्पित !) संधिप्रकाशात उभी असणारी झाडे अचंबित होऊन खाली पहात होती . खाली पसरलेल्या सावल्यात , विविध वयोगटातील असंख्य मुलं , शांतपणानं बसली होती . कुणीच बोलत नव्हतं . एक प्रकारचा आत्मविश्वास आणि निर्धार त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता . त्यांच्या हातात घोषणा लिहिलेले बोर्ड दिसत होते . फारच वेगळ्या […]

चतुरस्र व्यक्तिमत्त्वाच्या अपरिचित पैलूंचं दर्शन – रिंगणाबाहेरून

‘पॉप्युलर’ प्रकाशन संस्थेचे रामदास भटकळ यांनी स्वतःच्या प्रकाशन व्यवसायाव्यतिरिक्त ज्या इतर क्षेत्रात मुक्त मुशाफिरी केली, त्याचा प्रांजळ आलेख त्यांनी ‘रिंगणाबाहेर’ या पुस्तकात तपशिलांसह मांडला आहे. ‘मौज प्रकाशन गृहा’ ने तो सहजसुंदर रूपात बंदिस्त करून प्रकाशित केला […]

इमाम आणि देवदूत

शेकडो वर्षांमागची गोष्ट. इराण देशातील एका पहाडाजवळ एका विस्तीर्ण तलावाच्या काठी एक लहान झोपडी होती. त्या झोपडीत एक गरीब धनगर, त्याची बायको, व इमाम नावाचा त्यांचा आठ-दहा वर्षांचा एक लहान मुलगा, ही रहात असत. या तिघांनाही पोटाकरता संबंध दिवस राबावे लागे. धनगर व त्याची बायको पहाडावर जाऊन सरपण गोळा करीत व त्याच्या मोळ्या बांधून त्या जवळच्या शहरात नेऊन विकीत. […]

आदित्यराणूबाई

ऐका आदित्यराणूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुलं, दूर्वा, आणायला रानात जात असे. तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणानं विचारलं, “काय गं बायांनो, कसला वसा वसतां? तो मला सांगा.” “तुला रे वसा कशाला हवा? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील.” ब्राह्मण म्हणाला, “उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. […]

एशियन पेंटस्

जगातील २०० लघु कंपन्यांमध्ये ‘एशियन पेंटस्’ला २००२-०३ मध्ये ‘फोर्बस्’ मासिकाने ‘Best Under a Billion’ ॲवॉर्ड दिले, इकॉनॉमिक्स टाइम्स, बिझनेस टुडे, फोर्बस  नियतकालिकांनी कंपनीची आशियातील सर्वात बेस्ट कंपनी म्हणून नोंद घेतली. […]

1 8 9 10 11 12 80
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..