2024
श्री देवेंद्रनाथ महाराज – एक महान विभूती
आपली भारतभूमी ही साधुसंतांच्या वास्तव्याने पावन झालेली मंगलभूमी आहे. ईश्वरी साक्षात्कार हेच सर्वोच्च मूल्य मानून त्याच्या प्राप्तीसाठी ज्यांनी आपले संपूर्ण जीवन वाहिले अशा हजारो सत्पुरुषांची ही कर्मभूमी आहे. […]
बिल्ट कागद कंपनी
आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाचं सुमारे ९५ टक्के अवलंबित्व हेकागदावर अर्थात पेपरवर आपली दैनंदिनी देखील कागदावर अवलंबून आहे. साधा कुणाला पत्तालिहून द्यायचा असेल तर कागदाची निकड भासते. कागदाचा शोध जरी चीनमध्ये लागला असला तरी कागदाचं सर्वाधिक,उत्पादन मात्र आपल्या हिंदुस्थानातचः आपण यूएस., ऑस्ट्रेलिया, युरोपियन राष्ट्रांसह सुमारे ३0′ ते ३५ राष्ट्रांना कागद पुरवतो. त्याचा कागद बोलतो’, ‘कागदावर आणा’, ‘कागद […]
चित्रकाराचे चातुर्य
एक चित्रकार होता. फारच सुंदर अशी चित्रे काढायचा तो. त्याची चित्रे पाहून लोक अत्यंत प्रभावीत होत असत. दूरवर त्याची ख्याती पसरली होती. त्यानं काढलेलं चित्र प्राप्त करण्यासाठी लोकांची नेहमी धडपड चालत असे. या प्रतिभावान कलावंताचे चित्र मिळविण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याची तयारी लोक दाखवीत. प्रचंड अशी लोकप्रियता, प्रसिद्धी अन् पैसा मिळाला तरी हा चित्रकार अहंकारापासून दूर होता. त्याचा स्वभाव अगदी सरळ होता. त्याला पैशाचा मोह मुळीच नव्हता. एखादा रसिक त्याच्या चित्रासाठी मोठी रक्कम द्यायला असमर्थ असला तर तो त्याची अडवणूक करीत नसे. तो देईल त्या रकमेत आपलं चित्र त्याला देऊन टाकी. कमविलेल्या संपत्तीचा बराचसा भाग तो रंजल्या-गांजलेल्यांना मदत करण्यात खर्च करीत असे. […]
पहिले विद्युत वाहन
पहिले व्यावहारिक विद्युत वाहन रॉबर्ट डेव्हिडसन याने इंग्लंडमध्ये १८३७ साली तयार केले. त्यानंतर पॅरिस येथील ऑम्नी बस कंपनीने १८८१ मध्ये पहिले सार्वजनिक विद्युत वाहन प्रचारात आणले. शिसे आणि विरळ सल्फ्युरिक आम्ल यांच्यामधील रासायनिक क्रियेवर कार्य करणाऱ्या विद्युत घटमालेवर चालणाऱ्या मोटारगाड्या व ट्रक्स अमेरिकेत १८८० नंतरच्या दशकात वापरात होत्या. […]
सोमवारची कहाणी
एक म्हातारी बाई तिनं घरचं कामकाज आटपलं. मुलाबाळांना खाऊ घातलं. लेकीसुनांना न्हाऊ घातलं. गाईवासरांना चारा घातला. त्यांचा आत्मा थंड केला. आपल्या जिवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध व फूल घेतलं. चार तांदुळाचे दाणे घेतले. दोन बेलाची पानं घेतली आणि वाटीभर दूध घेतले. दुपारी म्हातारीबाई देवळात आली. मनोभावे पूजा केली. थोडं दूध नैवेद्याला ठेवलं. देवाची प्रार्थना केली. “जय महादेवा, नंदिकेश्वरा, राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं; तुझा गाभारा भरला नाही. माझ्या वाटीभर दुधाने भरणार नाही. पण मी आपली खुलभर दूध भक्तीनं अर्पण करते.” […]
वसई : इतिहासातली आणि आजची
वसई तालुका ५२६ चौ . मैल इतका विस्तीर्ण आहे . पूर्वेला सह्याद्रीच्या रांगा तर पश्चिमेला अरबी समुद्र , उत्तरेला वैतरणा नदी , दक्षिणेला नायगावची खाडी . पर्वताच्या रांगा आणि अरबी समुद्र यामध्ये वसलेला हा तालुका चहाच्या बशीसारखा ! त्यामुळे पोर्तुगिजांनी या प्रदेशाला ‘ बेकेम ‘ म्हटले तर ब्रिटिशांनी ‘ बॅसीन ‘ . पुढे स्वातंत्र्यानंतर वसई असे नामकरण झाले . या भूमीला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे . बौद्ध राजे ते थेट पोर्तुगीज , ब्रिटिशांनी येथे राज्य केले . […]
सीकेपी समाज काल- आज आणि उद्या
शक्ती, युक्ती, बुद्धी आणि कणखर मनगटातील दमदार समशेरीबरोबरच या ज्ञातीच्या लेखन चातुर्याच्या अनेक बाबींबरोबरच समयसूचक योग्य व कमी लेखात खोचक, बोचक आणि भावनात्मक लिखाणशैलीचे वैशिष्ट्य म्हणजे सी. के. पी. ज्ञाती असे समीकरण इतिहास पूर्व काळापासून ऐकायला व वाचायला मिळते. परंतु आज आपला समाज नेमका कुठे आहे? राजकीय किंवा सामाजीक समीकरणात त्याचे नेमके स्थान काय? […]
स्मार्ट तंत्रज्ञान
स्मार्टफोन म्हणजे हातातला पर्सनल कॉम्प्यूटर होय. या स्मार्टफोनचे मूळ हे टेलीफोन आणि कॉम्प्यूटर तंत्रज्ञान यांच्या एकमेकांशी संलग्न होण्यात दडलेले आहे. १९७३ साली टेलीफोन आणि कॉम्प्यूटर तंत्रज्ञान एकमेकांजवळ येऊ लागले आणि १९९४ मध्ये सेलफोन बाजारात आला. […]