चित्रकाराचे चातुर्य
एक चित्रकार होता. फारच सुंदर अशी चित्रे काढायचा तो. त्याची चित्रे पाहून लोक अत्यंत प्रभावीत होत असत. दूरवर त्याची ख्याती पसरली होती. त्यानं काढलेलं चित्र प्राप्त करण्यासाठी लोकांची नेहमी धडपड चालत असे. या प्रतिभावान कलावंताचे चित्र मिळविण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याची तयारी लोक दाखवीत. प्रचंड अशी लोकप्रियता, प्रसिद्धी अन् पैसा मिळाला तरी हा चित्रकार अहंकारापासून दूर होता. त्याचा स्वभाव अगदी सरळ होता. त्याला पैशाचा मोह मुळीच नव्हता. एखादा रसिक त्याच्या चित्रासाठी मोठी रक्कम द्यायला असमर्थ असला तर तो त्याची अडवणूक करीत नसे. तो देईल त्या रकमेत आपलं चित्र त्याला देऊन टाकी. कमविलेल्या संपत्तीचा बराचसा भाग तो रंजल्या-गांजलेल्यांना मदत करण्यात खर्च करीत असे. […]