अनुभवाचे बोल
आयुष्यात भेटलेली काही माणसे, अनुभवलेले काही प्रसंग आपल्याला बरेच काही देऊन जातात. त्यातल्या काही माणसांची आणि अनुभवांची एक झलक. […]
आयुष्यात भेटलेली काही माणसे, अनुभवलेले काही प्रसंग आपल्याला बरेच काही देऊन जातात. त्यातल्या काही माणसांची आणि अनुभवांची एक झलक. […]
राष्ट्रपुरुष कुणा एका जाती वा धर्माचे असू शकत नाहीत. ते देशाचे असतात. भारताचे माजी लष्करप्रमुख जन.अरुणकुमार वैद्य यांच्याबद्दलही असेच म्हणता येईल. तथापी मुंबई येथे २६ जानेवारी १९२६ रोजी चांद्रसेनिय कायस्थ प्रभू घराण्यात त्यांचा जन्म झाल्यामुळे त्यांचा अभिमान सर्व सी.के.पी. समाजास असणे साहाजिकच आहे. […]
स्वयंपाककरण्यापूर्वी, करत असताना आणि करून झाल्यावर स्वयंपाकाचा ओटा, गॅसच्या शेगड्या स्वच्छ करण्यासाठी हाताजवळ एखादं ओटा पुसायचं फडकं ठेवावे. त्याने मधून मधून ओटा, शेगड्या पुसून घ्याव्या. त्यामुळे ओट्यावर सांडलेले पदार्थ लगेच साफ करता येतात. सांडलेले अन्न पदार्थ बराच वेळाने साफ करायचे म्हटले तर ते वाळल्यामुळे ओटा सतत धुवावा लागतो. […]
सिंगापूरमधल्या एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेतील मुलांच्या पालकांना वार्षिक परीक्षेपूर्वी एक पत्र पाठविले. हे पत्र भारतातल्या सर्व पालकांना उद्देशून आहे असे वाटते. पत्राचा मसुदा थोडक्यात असा होता. प्रिय पालकांनो, तुमच्या मुलांच्या वार्षिक परीक्षा लवकरच सुरु होणार आहेत. तुम्ही सगळे आपापल्या पाल्यांनी उत्कृष्ट मार्क मिळवावेत या विवंचनेत असणार. परंतु मनात ही इच्छा बाळगताना एक गोष्ट विसरु नका. […]
‘धडधड धडधड कर्र…कच…कच…!’ कर कचुन एसटीचा ब्रेक लागला अन् सिटवर बसुन मान खाली पाडुन पेंगाटलेल्या महादाची झोपमोड झाली. आपल्या हातातल्या ईस्टीलच्या चिमट्यानं गाडीतल्या लोखंडी रॉडवर प्रहार करत,“अय्य्….चलो भुर्याचीवाडी….चलो भुर्याचीवाडी…..!” असा कंडक्टरने पुकारा दिला आणि त्या पुकार्यानं महादा भानावर आला.आपल्या सोबतची शबनम बॅग गळ्यात लटकवत सोबतच्या सुदामा अन् रम्यालं आवाज देत तो गडबडीतच एस.टी.तून खाली उतरला.सुदामा आणि […]
“मलयगिरीचा चंदन गंधीत, धूप तुला दाविला…. स्वीकारावी पुजा आता, उठी उठी गोपाळा…!” कुमार गंधर्वांच्या आवाजातली ही अमर भूपाळी शंकर मथार्याच्या टेपरिकॉर्डरवर लागली तसं सारजाची झोप मोडली.शंकर मथार्याच्या टेपरिकॉर्डरचा भोंगा वाजनं आण गल्लीतल्या बायामाणसांचं पहाटचं उठनं हे मागील काही वर्षांपासून गल्लीतल्या बायकांसाठी नेहमीचच होतं.गावात फक्त शंकर म्हाताऱ्याच्या घरीच टेपरिकॉर्डर होता. शंकर मथरा पहाट सुखाची चांदणी निघाली की […]
डॉ. सुनील देवधर यांनी आकाशवाणीत ३८ वर्षे काम केले. ते आकाशवाणी पुणे केंद्रातून सहायक संचालक पदावरून निवृत्त झाले. त्यांचा निवेदक ते सहायक संचालक या पदापर्यंतचा प्रवास एका हळव्या मनाचा कवी, कलाकार म्हणून जितका परिचित आहे, तितकेच त्यांची कणखर व्यक्ती म्हणूनही वेगळी ओळख आहे. […]
लक्ष्मीनारायण सुब्रह्मण्यम हे कुशल व्हायोलिन वादक म्हणून जगद्विख्यात आहेत. कर्नाटक शैली आणि पाश्चिमात्य शैली दोन्हींवर त्यांचं प्रभुत्व आहे. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्यांनी लोकांसमोर आपली कला सादर करून आपल्या कुशलतेची चुणूक दाखवून दिली होती. एम.बी.बी.एस डॉक्टर असलेल्या एल. सुब्रह्मण्यम यांच्या दोनशेहून अधिक रेकॉर्डस् प्रसिद्ध झाल्या आहेत. […]
महाराष्ट्रातील नामवंत प्रसूतीतज्ज्ञ, शतायुषी या मराठीतील सर्वाधिक खपाच्या दिवाळी अंकाचे संपादक आणि उत्तम लेखक डॉ. अरविंद संगमनेरकर यांनी पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रसूतीतज्ज्ञ म्हणून काम केले. त्यांनी महाराष्ट्र आणि राज्याबाहेरील आरोग्य शिबिरांमध्ये सहभागी होऊन दोन लाखांहून अधिक महिलांची आरोग्य तपासणी केली. […]
ग्रामीण भागातील ‘रोजगार निर्मिती’ या क्षेत्रात देशातील इतर राज्यांना आदर्शकृत ठरलेल्या महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेचे जनक आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापतिपद अठरा वर्षे सांभाळणारे ज्येष्ठ गांधीवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वचिंतक विठ्ठल सखाराम तथा वि. स. पागे यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions