मुख्याध्यापकांचे पत्र
सिंगापूरमधल्या एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळेतील मुलांच्या पालकांना वार्षिक परीक्षेपूर्वी एक पत्र पाठविले. हे पत्र भारतातल्या सर्व पालकांना उद्देशून आहे असे वाटते. पत्राचा मसुदा थोडक्यात असा होता. प्रिय पालकांनो, तुमच्या मुलांच्या वार्षिक परीक्षा लवकरच सुरु होणार आहेत. तुम्ही सगळे आपापल्या पाल्यांनी उत्कृष्ट मार्क मिळवावेत या विवंचनेत असणार. परंतु मनात ही इच्छा बाळगताना एक गोष्ट विसरु नका. […]