भाऊबीज
डोळ्यासमोर घड्याळातील काटे ‘आठ पंचवीस ‘ची वेळ दाखवत होते आणि डोक्यामध्ये ” आता ही नोकरी जर नाही मिळाली तर परत घरात पाऊल टाकू नकोस, तिकडेच तोंड काळं कर ” हे आप्पांचे शब्द घुमत होते, अश्या परिस्थितीत साडे आठची मुंबई ला जाणारी उद्यान एक्स्प्रेस पकडण्यासाठी जीवाच्या आकांताने संजीव प्लॅटफॉर्म क्रमांक दोन कडे पळत सुटला होता… तेव्हढ्यात ट्रेन चा भोंगा वाजला अन ट्रेन हलली, हातातली बॅग सांभाळत त्याने समोर दिसलेल्या दरवाज्यातून अक्षरशः स्वतःला आत झोकून दिलं. […]