नवीन लेखन...

जंगलातील एक दिवस

खुप दिवसातुन गावाला दोन तीन दिवस राहण्याचा योग आला होता. सकाळी अंघोळ झाल्यावर चहा घेत असतानाच मित्र काशिनाथ आला.त्याला चहा दिला.चहा पित असतानाच तो म्हणाला.आज काय काम आहे का तुला?काम नसेल तर चल रानात जाऊया..मध कुठे भेटते का पाहू…रानात हे शब्द उच्चारताच मी लगेचच होकार दिला.माझ्याकडे पाण्याची कापडी पिशवी आहे त्यामध्ये पाणी थंड राहते.मी ती घेऊन […]

बडोदा वस्तूसंग्रहालय

वस्तुसंग्रहालय म्हणजे ऐतिहासिक ठेवा जतन व संवर्धन करण्याचे ठिकाण होय. ‘वस्तुसंग्रहालय’ या संकल्पनेचा उगम युरोपमध्ये झाला. इ.स. पूर्व तिसऱ्या शतकात अलेक्झांड्रीयामधील टॉलेमी राजाने आपल्या राजवाड्यात पहिल्यांदा वस्तुसंग्रहालय सुरू केले. या राजवाड्यातच अलेक्झांडर द ग्रेट यांचा ग्रंथसंग्रह ठेवण्यात आला होता. परंतु ग्रीक लेखक पॉसॉनियस यांच्या माहितीनुसार इ.स. दुसऱ्या शतकात अथेन्स शहरात एका मोठ्या दालनात काही पेंटिंग्ज सार्वजनिक प्रदर्शनासाठी ठेवलेल्या होत्या. ही प्राचीन काळातील सार्वजनिक वस्तुसंग्रहालयाची सुरुवात होती. […]

फक्रुद्दीन अली अहमद

भारताचे पाचवे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांचा जन्म १३ मे १९०५ रोजीं झाला. फक्रुद्दीन अली अहमद यांचे शिक्षण उत्तर-प्रदेश व दिल्ली येथे झाले. शिक्षण झाल्या वर ते १९२३ ला इंग्लैंडला गेले. तिथे कैम्ब्रिज मधून उच्च शिक्षण घेतले. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून १९६७ आणि १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आसाम राज्यातील बारपेटा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. […]

निवडणूक, अंधश्रध्दा, रेल्वे पोलीस व मस्तानबाबा

साधारण सन १९९० – १९९२ साल असावे लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या.माझी नेमणूक पुणे रेल्वे न्यायालयाला पोलीसांचा सरकारी वकिल म्हणून झालेली होती.त्यावेळी पोलीस खात्यात गाजलेले व नावाजलेले दोन पोलीस अधिकारी एक पुणे रेल्वेचे “पोलीस आधिक्षक” भुजंगराव मोहीते व दुसरे “होम डि वाय एस पी” माणीकराव दमामे नेमणूकीस होते. […]

शोधा म्हणजे सापडेल

मुख्य रस्ता आणि रेल्वे स्थानक यांना जोडणारी एक चिंचोळी गल्ली. गल्लीच्या दुतर्फा वेगवेगळी दुकानं. सुरवातीला वडापाव, दाबेली, सँडविच. मग एखादं झेरॉक्सचं दुकान. मध्येच एक मेहेंदी काढण्याचं प्रशस्त दालन. बाजूला कानातल्या गळ्यातल्याचं दुकान. लागून एखादी चहाची टपरी. पुढे स्टेशनरीचं दुकान. शिवाय पर्स, अत्तर, मोबाईल कव्हर आणि बरंच काही. विविध प्रकारची एक से एक दुकानं. त्याची नोकरीनिमित्त स्टेशनवर […]

दिवाळीची पोस्त

पोस्टमनची आणि त्या मुलीची हळूहळू चांगली दोस्ती जमली. दिवाळी जवळ आली होती. पोस्टमनला काय द्यावे याचा विचार ती मुलगी करत होती. तिला एक युक्ती सुचली. पत्र घेण्यासाठी दार उघडल्यावर तिला रोज दिसायचे की पोस्टमनची पावले मातीत उमटली आहेत. […]

जागतिक चहा दिन, पाऊस, चहावाला व व्हीस्की

इंग्रजांनी आणलेले इंग्रजी शिक्षण, रेल्वे गाडी, रोगप्रतिबंधक लशी,इंग्लिश दारू व या सर्वांच्याही पेक्षा कंकणभर सरस भारतात आणलेला चहा. या सर्वांनी भारतीय सामाजिक,आर्थिक,सांस्कृतिक,राजकीय व रोजच जगणंच व्यापून टाकलेल आहे. […]

प्रेमाची उधारी

उधारी संदर्भातल्या पाट्या तुम्ही आम्ही बाजारात, दुकानाबाहेर नक्कीच वाचलेल्या असतील. व्यापार हा कोणताही असो… म्हणजे खरमुरे विकणाऱ्या पासून तर टाटा, बिर्ला, मुकेश अंबानी असो… या ‘उधारी’ नावाच्या रोगापासून प्रत्येक व्यापारी, दुकानदार दूर राहण्याचा प्रयत्न करीत असतो परंतु कितीही खबरदारी बाळगली तरी ‘उधारी शिवाय धंदा नाही”, हेच त्रिकालाबाधित सत्य आहे.. यात शंकाच नाही. […]

रशियन म्हण आणि व्होडका ? एक तत्वज्ञानी दृष्टीक्षेप ?

पुर्वी reader digest ची पुस्तके मी आर्वजुन विकत घेत असें त्यात वेगवेगळ्या विषयावर छान लेख असत. शेवटी Word power नावाचे सदर वाचनीय असें. ‌ते विविध इंग्रजी वाक्प्रचारां संबंधी सदर होतें. त्याचे विविध अर्थ थोडक्यात देत असत. त्यामुळें इंग्रजी शब्द संग्रहात चांगली भर पडत असें. त्यावेळेस वाचनात आलेली रशियन म्हण म्हणजे, Russian proverb आशयार्थाने निश्चितच  प्रवर्तक अशीच […]

पावसाळ्यातील मेकओव्हर

पावसाळ्यात केसांमध्ये फंगल इन्फेक्शन होते. यासाठी काही घरगुती उपाय – – २ टेबलस्पून व्हिनेगरमध्ये १ टेबलस्पून लिंबुरस मिसळून स्काल्पला आठवड्यातून दोनदा लावा आणि मग धुवून काढा. – मेथी पेस्टमध्ये तीन टी स्पून ऑलिव्ह, अर्धा टी स्पून कॅस्टर ऑईल आणि नारळाचे तेल मिसळा व केसांना लावा व अर्ध्या तासाने धुवून काढा. – बियरने केसांना फायनल रिंस करा. […]

1 18 19 20 21 22 80
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..