नवीन लेखन...

प्रश्न – मोठ्यांचे आणि छोट्यांचे..

खरं म्हणजे मोठ्यांना असे लहान मुलांसारखे प्रश्नच पडत नाहीत. त्यांना प्रत्येकाला वाटतं असते आपलेच प्रश्न सगळ्यात मोठे असतात तेच आपल्याला सोडवता येत नाहीत. त्यांना त्यांच्या सोयीनुसार प्रश्न पडतात आणि जेव्हा गरज असेल अडलेले असेल तेव्हाच विचारतात. मोठे झाल्यावर निरागसपणा जाऊन इगो आलेला असतो. […]

कौपिनेश्वर मंदिर, ठाणे

श्री कौपीनेश्वर मंदिर हे एक ऐतिहासिक मंदिर आहे. हे मंदिर ठाणे शहराचे एक भूषण आहे. मासुंदा तलावाच्या पूर्वेला हे मंदिर उभे आहे. मुंबई गॅझेटिअर (ठाणे) पान क्र. ३५४ वर या मंदिराविषयी माहिती मिळते. त्यातील वर्णनाप्रमाणे हे ठाण्यातील सुप्रसिद्ध मंदिर सर्वात मोठ्या म्हणजे चौतिस एकर भूभाग व्यापणाऱ्या ठाण्यातील प्रसिद्ध मासुंदा तलावाच्या पूर्वेच्या काठी उभे होते. […]

चतुर बिरबल

अकबर बादशहाच्या पदरी अनेक सरदार होते. एका सरदाराला उंची दागिने घालण्याचा शौक होता. त्याच्या अंगावर नेहमी हिया-मोत्यांच्या माळा झगमगत असत. […]

सुरेश भट यांच्या गाजलेल्या मराठी गझल

तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ? एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ? अजुनही विझल्या न गगनी , तारकांच्या दीपमाला अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ? सांग, ह्या कोजागरीच्या , चांदण्याला काय सांगू ? उमलते अंगांग माझे.. आणि तू मिटलास का रे ? बघ […]

संकल्प बायकोशी न भांडण्याचा

मी तसे अनेक संकल्प कुठलाही नशापान न करता करतो.नशा न करण्याचाही संकल्प मी तसाच केला होता.परंतु माझा कोणताही संकल्प सिद्धीस जात नाही.मोठे संकल्प जाऊ द्या अगदी छोटे संकल्प देखील तडीस जात नाहीत.माझा मूळ स्वभाव संकल्पाच्या आड येतो. […]

कठडा

शहराच्या मध्यवर्ती भागात गोलाकार तळं. तळ्याभोवती बसण्यासाठी कठडा. कठड्याला लागून, तलावाच्या परिघात पादचारी मार्ग उर्फ जॉगिंग ट्रॅक. सकाळी आणि संध्याकाळी परिसर अगदी गजबजून जायचा. कोणी फेरफटका मारायला येणारे, कुणी व्यायाम म्हणून चालायला-पळायला येणारे. गप्पा मारायला येणारे ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळी, काही प्रेमी युगूलं आणि असे बरेच. “तो” सुद्धा रोज संध्याकाळी एक तास चालायला यायचा. […]

श्री अंबिका योग कुटीर ठाणे – एक सेवाव्रती संस्था

ही कथा आहे जवळजवळ सत्तर वर्षांपूर्वीची. तत्कालीन मुंबई इलाख्याच्या पोलीस खात्यामध्ये काम करीत असलेल्या पुंडलिक रामचंद्र निकम नावाच्या कॉन्स्टेबलची, म्हणजेच परमपूज्य हठयोगी निकम गुरुजी यांची. त्यावेळी कोणाला कल्पनाही नसेल की ही व्यक्ती किती महान बनणार आहे व केवळ स्वकर्तृत्वाचे बळावर योग क्षेत्रामध्ये आपली छाप पाडणार आहे. […]

कॅथेटर (कथा)

‘हॅलो, सुनील… कसा आहेस? काय म्हणतात अण्णा? बरंय ना सर्व…’ नेहमीचेच प्रश्न, त्याला नेहमीचेच उत्तर देऊन सुनीलने फोन कट केला. नुकताच ऑफीसमधून आला होता. पायमोजे काढून हातपाय धुऊन अण्णांच्या खोलीत गेला. अर्धांगवायूने त्यांना कायमचे अधू बनवले होते. स्वत:ला काहीच हालचाल करता येत नव्हती. बोलताही येत नव्हते. सुनील रोज सकाळ संध्याकाळ त्यांना व्हिलचेअरवर बसवून मागच्या अंगणात चक्कर […]

वटपौर्णिमा (कथा)

मीरग संपत आलता. आभाळ ठणठण व्हतं.ढग कुठ बियाल पण दिसत नव्हते.निराशेनं कौतीका वसरीत दुचित बसला व्हता. मनात घालमेलं चालली व्हती.काय कराव ते त्यालं काय बी सुदरयनं गेलतं.बसल्या जागुन उठायलं आवसन व्हत नवतं.त्यालं आस वाटु लागलं की आभाळानं ढगायबरोबरच आपलं आवसन बी पळवलय की काय.अन्नाचा घास गोड लागयन गेलता.मंग जरा चहान तरी बर वाटल मनुन कस बस […]

आयुष्य

तहान लागली होती भारी पण पाणी होतं विषारी, प्यावे तरी मरणार,  नाही प्यावं तरी मरणारचं समस्या ही जन्मभर राहीलीचं ना झोप झाली पूर्ण आणि स्वप्नेही अधुरी. आयुष्यात हवे असते बरंच काही, पण कळलं जेव्हा मिळालंय मला जितकं तितकंही , काहींच्या नशिबात नाही तेंव्हा तक्रार कांही राहीली नाहीं. -गिरीश.

1 20 21 22 23 24 80
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..