MENU
नवीन लेखन...

व्यवसाय

दोघी मैत्रिणी बोलत असतात. दोघी गृहिणी असतात. एक जण दुसरीला सांगते “अगं, मी ड्रायव्हिंग लायसेन्स काढायला गेले तर तिथल्या अधिकाऱ्याने मला विचारले तुमचा व्यवसाय काय? मी म्हणाले मी आई आहे” त्याने तुच्छपणे माझ्याकडे पाहिले आणि तो म्हणाला “म्हणजे तुम्ही काही उद्योगधंदा करत नाही तर तुम्ही नुसत्याच गृहिणी आहात. […]

दिल्ली नावामागचा इतिहास

दिल्ली ही भारताची राजधानी आहे. दिल्ली म्हणजेच भारताच हृदय. हिंदीमध्ये ‘ये दिलवालो की दिल्ली है’ असं म्हटलं जात. दिल्लीला ऐतिहासिक, भौगोलिक आणि आर्थिक वारसा लाभला आहे. ही दिल्ली परकीयांचे आक्रमण आपल्या अंगाखांद्यावर झेलत मोठ्या कणखरपणे उभी राहिली, याच दिल्लीने भारताचा स्वातंत्र्यलढा सर्वात जवळून पाहिला, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात याच दिल्लीच्या नावाने ‘चलो दिल्ली’ ही प्रसिद्ध घोषणा देण्यात आली, या दिल्लीने भारतीय तिरंगा ध्वजाला मुक्त आकाशात फडकतांनी पाहिलंय, या दिल्लीने भारतीय संविधानाचा निर्माण होतांनी पाहिलंय. […]

मुंबई ते ठाणे रेल्वे – १७१ वर्षे…

हिंदुस्थानी आगीची गाडी, तिला बांधला मार्ग लोखंडी मनाचाही वेग मोडी, मग कैची हत्ती घोडी… भारतात आगगाडीच्या आगमनाचे स्वागत करणारी एक कविताच गोविंद नारायण माडगावकर यांनी ‘मुंबईचे वर्णन’ या आपल्या पुस्तकात ‘कटाव’ या शीर्षकाखाली दिली आहे. ब्रिटिशांनी भारतातील आपले साम्राज्य अधिक मजबूत होण्यासाठी तसेच दळणवळण वेगाने होण्यासाठी आगगाडी म्हणजेच रेल्वेचे जाळे विणले. […]

देर आए, दुरूस्त आए

बार्बाडोस इथे झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम लढतीत टीम इंडियाने द.आफ्रिकेचा सात धावांनी चित्तथरारक पराभव करत २०१३ नंतर आयसीसी विश्वचषकाला गवसणी घातली आहे. दोन्ही संघांनी तुल्यबळ लढत दिल्याने सामना शेवटच्या षटका पर्यंत लांबला. मात्र हार्दिक पांड्याच्या चलाखीने आपला संघ वरचढ ठरला. अनेक उतारचढाव आणि विजयाचा दोलक दोन्ही संघाकडे आलटून पालटून फिरत असल्याने भारतीय पाठीराख्यांचा जीव कासावीस झाला होता. […]

आठवणी

सहज फेसबुक चाळत बसलो होतो. अचानक एका मित्राने ‘ठकठक’ पाक्षिका विषयी केलेली पोस्ट दिसली. ‘दिपू दि ग्रेट’, ‘बन्या’, ‘एश – अभी’ ही सदरे पुन्हा पाहून एखादा खूप जुना मित्र भेटल्या सारखा आनंद झाला. आठवणींच्या घोड्यावर दौडत दौडत मन कधी लहानपणी जाऊन पोहोचले कळलेच नाही. […]

प्रकाशमान ठिपके

उन्हाळ्याची सुट्टी असल्याने प्रणय आणि प्रगती काकांकडे गावी आले होते . रात्री जेवण झाल्यावर प्रणय, प्रगती व काकांची मुलं घराच्या अंगणात घोंगडीवर गप्पा मारत बसायची . तेव्हा त्यांचे विजूकाका त्यांना विज्ञानाच्या छान छान गमती जमतीच्या गोष्टी सांगायचे . मुलांना खूप मजा वाटायची . असेच एका रात्री विजू काका मुलांना गोष्टी सांगत असताना अचानक घराच्या अंगणात मुलांना […]

अंदमान यात्रा दैनंदिनीचे पान

दुपार झाली.रात्रीचे जागरण झाले होते तरी सर्वजण उत्साहात होते.बस आता सेल्युलर जेल च्या दिशेने निघाली होती.भोवतालचा परिसर निसर्गरम्य होता.मधेच कुठे वळणावर दिसणारा समुद्र शांत असल्याचे जाणवत होते.त्याचे भयकारी स्वरूप कसे असेल.मला त्सुनामी आठवली.पण यावेळी तिची आठवणही मी दूर भिरकावली. […]

बडोद्यातील ‘मुद्रण’ क्रांती

भारतातील लेखक-प्रकाशकांचे सगळ्यात मोठे आधारस्तंभ व आधुनिक भारताच्या इतिहासात सर्वात मोठे प्रकाशक ठरलेल्या सयाजीराव महाराजांनी बडोदा संस्थानात मुद्रण कलेच्या माध्यमातून केलेली ‘ज्ञानक्रांती’ आजच्या ‘ऑनलाईन’ जमान्यात समजून घेणे मार्गदर्शक ठरेल. […]

जगप्रसिद्ध लेखक विल्यम सिडनी पोर्टर ऊर्फ ओ’हेनरी

जगामधल्या जर पाच सर्वश्रेष्ठ लघुकथा लेखकांची यादी केली तर ओ’हेनरी याच नाव त्यात आवर्जून घ्यावं लागतं.अवघे सत्तेचाळीस वर्षाचं आयुष्य लाभलेला हा लेखक आपल्या कथा लिखाणामुळे इतका अजरामर झालेला आहे की उत्कृष्ट लघु कथा कशी असावी असं जर कोणी विचारलं तर टीकाकार आणि जाणकार समीक्षक एकच उत्तर देतात, लघुकथा फक्त ओ’हेनरी याच्या कथे सारखी असावी. अशी अदभूत मोहिनी त्याने साहित्य विश्वाला घातली होती. […]

1 21 22 23 24 25 82
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..