देर आए, दुरूस्त आए
बार्बाडोस इथे झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम लढतीत टीम इंडियाने द.आफ्रिकेचा सात धावांनी चित्तथरारक पराभव करत २०१३ नंतर आयसीसी विश्वचषकाला गवसणी घातली आहे. दोन्ही संघांनी तुल्यबळ लढत दिल्याने सामना शेवटच्या षटका पर्यंत लांबला. मात्र हार्दिक पांड्याच्या चलाखीने आपला संघ वरचढ ठरला. अनेक उतारचढाव आणि विजयाचा दोलक दोन्ही संघाकडे आलटून पालटून फिरत असल्याने भारतीय पाठीराख्यांचा जीव कासावीस झाला होता. […]