पोलिसांची प्रतिमा
स्वातंत्र्यापुर्वी म्हणजेच ब्रिटीश राजवटीपासूनच भारतातील जनमानसात पोलिसांबद्दलची प्रतीमा खूप डागाळलेली, मलिन झालेली आहे. आज भारत स्वतंत्र होऊन ६७ वर्षांचा कालावधी लोटला आहे, परंतु अद्यापही भारतीय समाजातील लोकांचा पोलीस दलाकडे पर्यायाने पोलिसांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललेला नाही. एक गोष्ट मान्य करावी लागेल, ती म्हणजे ब्रिटीश राजवटीतील उच्च दर्जाचे अधिकारी केवळ ब्रिटीशच असायचे व खालच्या कनिष्ठ दर्जाचे अधिकारी/अंमलदार हे पारतंत्र्यातील भारतीय होते. […]