नवीन लेखन...

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

कॉलेज व क्रिकेट जीवनातील अनेक चढउतार सुरू असताना माझ्या एका मित्राने मला एक दिवस विचारले, ‘चल येतोस का अक्कलकोटला, श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी ?’
पहिल्यांदाच काहीतरी वेगळे ऐकले म्हणून उत्सुकता व माझा एक मावस काका सोलापूर येथे राहात होता, त्याला भेटण्याच्या ओढीने त्याला हो म्हणालो आणि…श्री स्वामी समर्थांच्या प्रथम दर्शनासाठी निघालो, तेंव्हापासून बहुतेक दरवर्षी जायला लागलो. […]

दिवाळीचे बदलते संदर्भ

दिवाळी म्हणजे आठवते ती लवकर उठवणारी आई.उठा उठा दिवाळी आली,मोती साबणाची वेळ झाली असे सांगणारे आजोबा..दिवाळी सणाचे स्वरूप काळानुसार आणि समाजातील बदलांनुसार खूप बदलले आहे. पारंपरिक दिवाळीचा उत्सव धार्मिक व सांस्कृतिक महत्त्वावर आधारित होता, तर आधुनिक दिवाळीमध्ये सामाजिक, आर्थिक आणि तांत्रिक बदलांचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. […]

राजकुमार – विवादाच्या स्टेटमेंटमध्ये अडकलेला सशक्त अभिनेता

राजकुमार हा कायम वादाच्या भोवऱ्यात अडकलेला अभिनेता होता. त्यामुळे त्याचा अभिनय दुर्लक्षित राहीला. लक्षात राहिले त्याची इतरंबद्दल केलेली विधाने. […]

आजपासून दीपावली

दीपावली म्हणजे आपल्या आयुष्याला आकार देणारे एक प्रकाशपर्व ! आनंदाचा मंगलमय अमृतकलश घेऊन येणारे जीवनातील अनमोल क्षण !नवी स्वप्ने , नव्या आकांक्षा यांना मिळणारी सुवर्ण झळाळी म्हणजे हा दीपोत्सव ! आपल्या जगण्याला नवीन भान देणारी , आपल्या तनमनात वज्रशक्ती पेरणारी , नवसृजनाला आवाहन करणारी तेजाची आरती म्हणजे हा दिव्यांचा सण ! […]

शुभ दिपावली

२८ ऑक्टोबर पासून दीपावली ला सुरुवात होत आहे. सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा…. !!!!! २८ ऑक्टोबर २०२४- वसुबारस ! गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो ! २९ ऑक्टोबर २०२४- धनत्रयोदशी ! धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत ! निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो ! धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो ! ३१ […]

आदिवासींचा सखा : मोह वृक्ष

मोह हा मधुक गोत्रातील पानगळीचा मोठा वृक्ष आहे. तो जंगली वृक्ष आहे. भारतातील उष्ण प्रदेशातल्या पानगळीच्या जंगलात मोहाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. सह्याद्री, सातपुडा व विंध्य पर्वतातल्या जंगलात मोहाची झाडे आढळतात. कमी पावसाच्या कोरड्या व उष्ण हवामानात मोह वुक्ष वाढतो. समशीतोष्ण हवामानातही तो वाढतो. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार, ओरिसा या राज्यांतील अरण्यात मोहाची झाडे […]

बकासुराची गोष्ट

कौरवांनी पांडवांना कुंतीसह ठार मारण्याचा प्रयत्न केला. पण ते वाचले. पांडव ब्राह्मणाचा वेश धारण करून एकचक्रा नगरीत एका ब्राह्मणाच्या घरी येऊन राहिले. कुंती व भीम घरी रहात. बाकीचे चौघे पांडव भिक्षा मागून आणीत.
ते ती भिक्षा कुंतीकडे देत. त्यातला एक भाग ती भीमाला देई आणि बाकीच्या भागात कुंती, धर्मराज, अर्जुन, नकूल आणि सहदेव आपला उदरनिर्वाह करीत. […]

‘मोबाइल टॉवर’ चे दुष्परिणाम 

मोबाइल फोन आपल्याला सर्वात जवळचा झालेला आहे, म्हणून त्याच्यापासून फार नुकसान व्हायला हवे का? परंतु जास्त त्रास तर टॉवरपासून आहे. कारण मोबाइलचा वापर आपण एकसारखा करत नाही, परंतु टॉवर मात्र अहोरात्र रेडिएशन पसरवत असतात, प्राणीमात्रावर त्याचे दुष्परिणाम होत असतात. […]

शब्दांची दुनिया

शब्दांची दुनिया किती वेगळी आहे. एक एक शब्द म्हणता वाक्य तयार होते. आता मराठी मध्येच बघा एक सारखे असे किती शब्द आहेत किंवा असे म्हणता येईल एकाच शब्दाचे किती अर्थ आहेत. उदाहरणार्थ बघु.. अनंत, अंग इत्यादी. इथे अनंत म्हणजे अमर्यादित आणि परमेश्वर असे दोन अर्थ होतात. दुसरा शब्द पाहिला तर अंग म्हणजे शरीर हा एक अर्थ […]

लंकादहन

रावणाने कपटाने सीतेला पळवून नेल्यानंतर रामाला फार दु:ख झाले. त्याने सगळीकडे सीतेचा शोध सुरू केला. परंतु सीतेचा शोध लागेना. शोध करीत करीत राम-लक्ष्मण किश्किंधा नगरीपर्यंत येऊन पोहोचले. तेथे ‘वाली’ या नावाचा वानर राज्य करीत होता. त्याने आपला धाकटा भाऊ ‘सुग्रीव’ याच्यावर फार अन्याय केला होता. रामाने सुग्रीवावरील अन्याय दूर करण्याकरिता वालीला ठार मारले आणि सुग्रीवाला राज्यावर बसविले. या उपकाराची फेड म्हणून सुग्रीवाने रामाला मदत करण्याचे कबूल केले. त्याने आपले आणि इतर वानर राजांचे सारे सैन्य गोळा केले. लाखो वानर वीर गोळा झाले. […]

1 2 3 4 5 76
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..