पाटलाचा वाडा
गावाच्या खालतुन सोंडु पाटलाचा चिरेबंदी वाडा लय दिमाखात उभा व्हता.सोंडु पाटील मंजे मुलखातली नामीगिरामी आसामी व्हता.तरूणपणात बारा गावचे आखाडे पाटलानं आपल्या खिशात घातले व्हते.घरी शंभरक एकर जमीन,दहा बारा बैल जोड्या,पाच पंचेविस दुभते जनावर आन पन्नासेक एकर फळबाग आसा गड्याचा जुमला व्हता. […]