2024
सूर्यास्त
सूर्य चालला अस्ताला सगळं चैतन्य बरोबर घेऊन प्रकाशही बरोबर घेऊन माणूस गेल्यावरही असंच होत असेल का ? मनापासून शोक सारी माणसं करत असतील का? असंच सगळ चैतन्य प्रकाश बरोबर घेऊन तो जातो पण केवळ आठवणीत मागे उरतो मागे उरतो. सौ. झेलम संजय टिपणीस अलिबाग
सोनं येचितो मातीत….
सोनं येचीतो मातीतं…. सोनं येचतो मातीतं… संगणीच्या संगतीतं… मोती घामाचे पिकवितो… काळी मायच्या कुशीतं…. पशु पक्षी वृक्षवल्ली काळ्या मायची लेकरं सार तिच गणगोतं तिलं सृष्टीचा संसारं…. पिकं शेतात डोलते पाना फुलांनी सजते फुले काळीज बळीचं मनं हारखुन जाते….. मका पोटुशी पोटुशी… डोकं जवारी काढते… गहु मिशांना ताविते… फुलं सुर्याच डोलते… पक्षी झाडाशी बोलती, गाय गोठ्यात हंबरी, […]
आम्ही कायस्थ
आम्हास नाही तमा, संपत्तीची अन सत्तेची जोपासली आहेत आम्ही, नाती निष्ठेची अन् भक्तीची शिवरायांचा जाज्वल्य अभिमान, पाहिला अन् अनुभवलाही म्हणूनच आमच्यातही आम्ही जसाच्या तसा भिनवलाही अन् जपलाही कुलदैवतांच्या कृपेने आणि बुद्धीच्या जोरावर आम्ही अनेक अवघड गणिते सोडविली सत्तेची, राजेशाहीची धुरा आम्हीही सांभाळली इतिहास घडविला आम्ही तेजस्वी लेखणीने आणि तलवारीनेही विविधरंगी कलांनी जीवनेही रंगविली आम्ही आमचे शौर्य, […]
परीराणी आणि बेडूक
परीराणी एकदा उतरली तळ्यात घसरून पाय पडली त्यात हसू लागला कावळा सोबत होता बगळा बेडूक म्हणे! परीताई परीताई “कसली गं एवढी घाई कुठे जायचंय तुला घेऊन चल ना मला मी जातेच मावशी कडे ती राहते नदी पलिकडे यायचंय तर…. चल पण आवाज करायचा नाही मला त्रास द्यायचा नाही दिलास तर परत आणायची नाही म्हणून ‘बेडकाने मारली […]
स्वामी विवेकानंद बालपणीचे
कोलकत्याच्या उत्तरेकडील शिमुलिया नावाच्या विभागात गौरमोहन मुखर्जी मार्गावरील दत्त कुटुंबियांच्या भव्य अशा घरात स्वामी विवेकानंद यांचा दि. ०२ जानेवारी १८६३ रोजी जन्म झाला. सकाळी ६ वाजून ३३ सेकंदानी शुवनेश्वरी यांनी या स्वामी विवेकानंदांना जन्म दिला. […]
सुगीचे दिवस
नवरात्रामध्ये भातशेती फुलो-यात असते.त्यानंतर शिवारातुन बांधावरून सकाळी किंवा दुपारनंतर फेरफटका मारताना एक वेगळीच मजा असते.वारा भणभणत असतो.त्या वा-याबरोबर भाताचा सुंदर सुवास दरवळत रहातो.शिवारामध्ये अनेक जातीचे भातपीक लावलेले असते.परंतू प्रत्येक खाचराच्या बांधावरून चालताना वा-याबरोबर सुंदर असा सुगंध येत रहातो.जणू त्या खाचरातील भात पीक आपल्या अस्तीत्वाची जाणीव करून देत असते. […]
भाटातली पहाट
पहाटेतून भाट जागे झाले तेव्हा मान उंच करुन चंद्रीचा कोंबडा आरवला खाजणाकडील काला वारा अंगाला झोंबू लागला त्याची पर्वा न करता आसमंताला जाग आली काळोखाचे कांबळे दूर सारीत अवनी जागी झाली कराडी कुटुंबाची वस्ती विझल्या रॉकेलच्या बुदल्या मातीच्या चुलीत अंगार फुलला आणि झावळीच्या झोपडींतून धुराचे ढग उसळले. न बाळगलेली कराड्यांची कलकलणारी कुत्री रात्रभर जागल्याने गटारात घोरत […]
सार्वजनिक ग्रंथालय – वाचक – वाचन – संस्कृती
‘आजच्या युगात खरे विद्यापीठ पुस्तकांचा संग्रह करणे होय” हे टामस कार्लाइन यांचे विधान मोठे उद्बोधक आहे. प्रत्येकच कालखंडातील ग्रंथसंपत्ती पुढल्या पिढीसाठी नेहमीच उपकारक ठरली आहे. समाज जीवनात कितीही बदल झाले तरी ग्रंथालयाचे कार्य मात्र अनन्यसाधारणच राहणार आहे. ग्रंथ हेच माणसांचे गुरू, मित्र व पथदर्शक आहेत. अगदी अनादिकाळापासून ग्रंथांचे महत्व सर्वश्रुत आहे. […]