विपरीत ज्ञान
ऐक्याचं मुद्दल जर मोडत नसेल आणि भक्तीचा विलास जर करता येत असेल, ऐक्याच्या मुद्दलाला धक्का न लागता म्हणजे अद्वैत अवस्थेला धक्का न लागता जर भक्ती होत असेल तर का न करावी? सागराला बाधा न येता जर त्याच्या वरची लाट त्याच्या वरचा तरंग होऊन मजा जर भोगता येत असेल तर का न भोगावी? […]