महाराष्ट्राच्या अरण्यातील वृक्षसंपदा – भाग ४ – पांथस्थांना विसावा देणारा करंज वृक्ष
करंज हा सदाहरित वृक्ष भारतात सर्वत्र आढळून येतो. याचे वनस्पतिशास्त्रातील नाव ‘पोंगॅमिया पिन्नाटा’ असे आहे. सर्व प्रकारच्या हवामानात याची वाढ होते. काळी चिकणमाती अथवा जांभ्या जमिनीत याची वाढ चांगली होते. हा पश्चिम घाटातील मूळ रहिवासी असून ब्रह्मदेश, आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेपर्यंत पोहोचला आहे. […]