नवीन लेखन...

ज्येष्ठ कलाकार नयना आपटे

नयना आपटे या ज्येष्ठ अभिनेत्री शांता आपटे यांच्या कन्या, शांता आपटे यांची कडक शिस्त, व बाबुराव आपट्यांची करडी नजर या वातावरणात नयना आपटे लहानाच्या मोठ्या झाल्या. लहानपणापासून अंगभूत कलागुणांना खतपाणी घालत त्यांची निगराणी करत, परिस्थितीशी जुळवून घेत नयना आपटे एक कलाकारी व्यक्तिमत्त्व घेऊन लोकांसमोर आल्या आणि रसिकमान्य झाल्या. […]

वरळी चाळ ते दुबई – गिनीज रेकॉर्ड

मेहनत, जिद्द, काहीतरी वेगळे करण्याची धडपड, प्रवाहाविरुद्ध जाणे आणि हे करताना जीवनसखीची जोड असली की, माणसाचे आयुष्य कमालीच्या उंचीवर झेप घेते, याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे अशोक कोरगावकर. एक काळ वरळीतील चाळीत घालवलेल्या अशोक कोरगावकरांच्या नावे आज दुबईत गिनीज बुक ऑफ रेकॉर्डची नोंद आहे. व्यवसायाने स्थापत्यतज्ज्ञ अर्थात आर्किटेक्ट असलेले अशोक कोरगावकर यांच्यामुळे मुंबईचे नावही आज आखाती देशात गाजत आहे. […]

ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे

सुलभा देशपांडे या माहेरच्या सुलभा कामेरकर. मुंबईतच लहानाच्या मोठय़ा झालेल्या सुलभा देशपांडे यांनी सिद्धार्थ महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शिक्षिका म्हणून छबिलदास हायस्कूलमध्ये कारकीर्दीची सरुवात करणाऱ्या सुलभाताईंचे रंगभूमीशी इतक्या सहजतने धागे जुळले की पुढे याच छबिलदास हायस्कूलमध्ये ‘अविष्कार’च्या रुपाने त्यांनी नाटय़चळवळीचे कार्य उभारले. […]

अंतराळातील अश्वत्थामा

मी आणि अय्यर जिवश्‍चकंठश्‍च मित्र होतो. आता होतो असंच म्हणायला हवं. कारण अय्यर आता हयात नाही. नाही तरी कसं म्हणावं? कदाचित असूही शकेल. असला तरी देखील तो मला आणिमी त्याला या पृथ्वीतलावर भेटू शकणार नाही हे मात्र निश्‍चित. […]

श्रीनगर – काश्मीर रेल्वे : स्वप्न की सत्य?

काश्मीर भारताशी रेल्वेने जोडलं जाईल हे १२५ वर्षांपूर्वीचे स्वप्न.  या रेल्वेमार्गाच्या बांधणीची पहिली कल्पना १८८९ मध्ये काश्मीर संस्थानातील डोगरा जमातीचे प्रमुख महाराजा प्रतापसिंग यांनी मांडली होती. जम्मू-श्रीनगर रेल्वे प्रकल्पाचं ऑफिस रीआसी या गावात उघडलं होतं. […]

अमेरिकन विनोदी लेखिका अर्मा बॉम्बेक

अर्मा बॉम्बेक या अमेरिकेन लोकांची अत्यंत लोकप्रिय आणि जिचं साहित्य प्रचंड वाचलं जातं, अशी प्रसिद्ध विनोदी कथाकार! त्यांनी घरगुती प्रसंगावर आणि रोजच्या आयुष्यात नेहमी घडणाऱ्या प्रसंगांवर अत्यंत खुसखुशीत भाषेत मिश्कील लेखन करून प्रचंड लोकप्रियता मिळवली. […]

मीच एव्हढा शहाणा कसा – मनोगत

आपण मोठेपणी लेखक व्हावं, असं सर्वसाधारणपणे कोणालाही वाटत नाही किंवा आपल्या मुलाला, मुलीला लेखक होण्याची इच्छा व्हावी असं कुठल्या पालकांनाही वाटत नाही. लेखकच काय, गायक, संगीतकार, चित्रकार व्हावं असंही लहाणपणी कोणाला वाटत नाही किंवा वाटू दिलं जातही नाही. शाळेच्या दिवसांपासूनच या सर्व गोष्टींना ‘एक्स्ट्रा करिकुलर अॅक्टिव्हिटीज’ असं गोंडस नाव दिलेलं असतं. […]

जनसंघाचे प्रथम महामंत्री दीनदयाळ उपाध्याय

पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता. भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला. […]

श्रद्धा म्हणावी की अंधश्रद्धा……

सायन्स अजून पर्यंत व्हेन्स म्हणजे नसा बनऊ नाही शकल. डॉ.अब्दुल कलाम यांनी स्वतः त्यांच्या एका भाषणात म्हटलेले आहे की आपण या जगाला चालवतो, पण आपल्याला चालवणारी आपल्याला कंट्रोल ठेवणारी एक शक्ती वर आहे. ते तर स्वतः एक खूप मोठे सायंटिस्ट होते. […]

परिक्रमा श्री अष्टविनायकांची

भारताची भूमी आध्यात्मप्रवण आहे. भारतीय लोक स्वभावतःच धर्मनिष्ठ आणि पापभीरू आहेत. देवावर त्यांची अलोट श्रद्धा आहे. इथे अनेक देवदेवता आणि त्यांची देवळे आहेत. ब्रह्मा-विष्णू-महेश-श्रीकृष्णा… प्रमाणेच इथे ‘श्रीगणपती’ या देवालाही लोकमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे. गणांचा अधिपती म्हणून याला गणपती म्हणतात. कुणी सुखकर्ता तर आणखी कुणी विघ्नहर्ता असेही म्हणतात. […]

1 39 40 41 42 43 83
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..