अभिनेत्री पूर्णिमा
अभिनेत्री पूर्णिमा यांचे खरे नाव ‘मेहर बानो’ होते. पूर्णिमा यांचे वडील हे मनमोहन देसाई यांचे वडील किकूभाई देसाई जे फ़िल्म डिस्ट्रीब्यूटर होते त्यांच्या ऑफिस मध्ये अकाऊंट्सचे काम बघत होते. पूर्णिमा यांची आई मुस्लिम होती. पूर्णिमा यांना चार बहिणी व एक भाऊ. पूर्णिमा यांची मोठी बहीण शिरीन यांनी १९३०च्या दशकात ‘बम्बई की सेठानी’, ‘पासिंग शो’, ‘ख़्वाब की दुनिया’, ‘स्टेट एक्स्प्रेस’ व ‘बिजली’ अशा चित्रपटात कामे केली होती. […]