नवीन लेखन...

२७ फेब्रुवारी १९७६ – कभी कभी चित्रपट प्रदर्शित

यश चोप्रा यांचा ‘कभी कभी’हा अविस्मरणीय चित्रपट २७ फेब्रुवारी १९७६ रोजी प्रदर्शित झाला होता.अमिताभ बच्चन यांच्या चित्रपट कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरलेल्या या चित्रपटात राखी, शशी कपूर, ऋषी कपूर,वहिदा रहमान,नीतू सिंग यांच्या भूमिका होत्या. […]

मराठी भाषा गौरव दिन

मराठी भाषा ही आपल्यासाठी फक्त एक भाषा नसून ममतेचे वासल्याचे बोल आहेत. कुठल्याही शस्त्राची गरज मराठी शब्दांना लागत नाही . कारण मार्दव, ममत्व हे या मराठी भाषेच्या ठाई कायमच वसलेले असते. दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस ” मराठी भाषागौरव दिन” म्हणून साजरा केला जातो. […]

माझी माय मराठी

लिहितो मराठी बोलतो मराठी शिकतो मराठी शिकवते मराठी संस्कार मराठी संस्कृती मराठी शब्द मराठी शब्दात मराठी म्हणून भाषा मराठी सण मराठी वार मराठी उत्सव मराठी उत्सवात मराठी पाडवा मराठी गोडवा मराठी वारी मराठी वारकरी मराठी म्हणून टाळ चिपळीचा नाद मराठी विर मराठी शुर मराठी तिर मराठी नुर मराठी सैनिक मराठी सैन्यात मराठी क्रांतीवीर मराठी स्वातंत्र्यवीर मराठी […]

अहंकार

अहंकार हा माणसाचा स्थायी गुणधर्म आहे असे मला वाटते.आपण उपजतच अहंकारी असतो हे सत्य स्वीकारायला हवे.तसाही थोडाफार अहंकार असायलाच हवा. […]

कर्णfool…..

घरात टी व्ही पहात असताना डोक्यावर भणाणता पंखा असल्याने , पात्रांचे संवाद नीट ऐकू येत नव्हते . मी आवाज मोठा करायला सांगितल्यावर ” अजून ? ” अशी मोठ्ठ्याने सामुदायिक पृच्छा झाली . मी ” हो ” म्हणाल्यावर सर्वांनी एकमेकांकडे पाहून भुवया उंचावल्या . काही दिवसांनी हेडफोनस् लाऊन यू ट्यूब वरची गाणी ऐकत होतो. दरवाज्याची बेल वाजली […]

राजकारणांतील वैर

राजकारण म्हणजे काय? देशावर अथवा देशाच्या एका भागावर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे उद्योग. ही अगदी ढोबळ व्याख्या झाली पण सत्ता मिळवण्याचे प्रयत्न नक्कीच राजकारणाचा केंद्रबिंदू असतो. लोकशाहींत ही सत्ता मिळवायची तर निवडणुका आल्या पक्ष आले. […]

देखभाल आणि आपत्कालीन यंत्रसामग्री

रेल्वेसेवा व्यवस्थित सुरू राहण्यासाठी तिची देखभाल ही अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यासाठी विशेष प्रकारची यंत्रे वापरावी लागतात. तसेच, अपघातासारख्या संकटकालीन परिस्थितीतसुद्धा विशेष प्रकारच्या सामग्रीचा वापर करावा लागतो. देखभालीसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्रीची ही ओळख… […]

बधिर शांतता

मुंबईत बोरिवली पश्चिमेला राहणाऱ्या माझ्यासारख्या असंख्य सिनेमाभक्तांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे एकेकाळी फुलांनी सजवलेला हाऊसफुल्लचा बोर्ड दिमाखात मिरवणारी आमची चित्रमंदिरे म्हणजेच अजंठा, डायमंड आणि जया सिनेमा ह्यावर काहीतरी लिहूया असा विचार गेले अनेक महिने डोक्यात फिरत होता. मात्र त्या लिखाणासाठी कुठलीच मूलभूत आणि जुजबी माहिती ना माझ्याजवळ होती ना गूगलबाबांकडेदेखील. नुकताच बोरिवलीला जाण्याचा योग जुळून आला होता. […]

श्रीराम – सामाजिक समरसता

संपूर्ण जगात सर्व गुण संपन्न,सर्व श्रेष्ठ पुरुष श्रीरामचंद्र होऊन गेलेतं. रामांनी आपल्या सद्विचार, सद्वर्तन, सदाचार, सद्- व्यवहाराने पूज्य स्थान प्राप्त केले आहे. राम उत्तम पुत्र, उत्तम बंधू, उत्तम मित्र, उत्तम राजा, उत्तम पति, मातृभक्त, पितृभक्त, कर्तव्यकठोर, सत्यप्रतिज्ञ पुरुष होते. एक बाणी, एक वाणी, एकवचनी, एक पत्नी व्रताचे रामांनी आजीवन पालन केले. आदिकवी वाल्मिकींनी राम जसा थोर, आदर्श आहे लिहिले तसाच तो एक मानवही आहे. […]

मुहूर्त आणि व्य‌वहारातील वस्तुस्थिती

काहीं नविन करायचे असलें किं मुहूर्त काढला जातो त्यात काहीं वावगें नाहीं ज्याचा त्याचा श्रध्देचा विषय आहें. अगदी लहानपणी मनात कोरली गेलेली घटना म्हणजे, आमच्या घरासमोर एका मिठाई दुकानाचा धुमधडाक्यात शुभारंभ झाला होता. पण नंतर काहीं वेळात दुकानाला काहीं कारणाने आग लागली. नशिबाचा भाग असा किं जीवीत हानी काहीं झाली नाही. योगा योगाचा भाग असा किं […]

1 57 58 59 60 61 80
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..