नवीन लेखन...

श्रीमंत सासर

गरीब घरातून आलेल्या मुलीला तिच्‍या श्रीमंत सासरकडचे तिच्या माहेरच्‍या गरिबीची पदोपदी जाणीव करुन देत असतात, ही गोष्‍ट प्रकर्षाने जाणवत राहते. […]

दिलीपकुमार… अभिनयाचा वटवृक्ष

मी खरोखरच मुंबईच्या चित्रपटसृष्टीत आलो. कधी वाटलं नव्हतं की या खूप मोठ्या अभिनेत्याशी माझे मैत्रीचे नाते निर्माण होईल… एकदा दिलीपसाहेबांच्या पाली हिलवरील बंगल्यावर जाण्याचा योग आला. त्यांनीच मला गप्पांसाठी एका संध्याकाळी आमंत्रित केले होते. मी धरधरत होतो. गोंधळलो होतो. गप्पाना कशाने सुरुवात करायची, नेमके काय बोलावं याचा दिवसभर मी विचार करत होतो आणि मला काही सुचतच नव्हते. अशातच संध्याकाळ कधी झाली हे समजलेच नाही… त्यांच्या बंगल्यावरील हिरवळीवर ते आणि सायराजी यांच्यासोबत अतिशय शांतपणे, हळूवारपणे आमच्या गप्पा सुरू झाल्या. […]

विरोधाभास आवडीचा

मला जुनी हिंदी गाणी आवडतात.अगदी सिनेमा भारतात आला तेव्हापासून आत्तापर्यंत!अर्थात आत्ताची काही निवडक गाणी आवडतात. सत्तरच्या दशकापर्यंत आणि आत्ता यांच्या तुलनेत अगोदरची गाणी जास्त आवडतात. गाणी आवडतात म्हटलं की त्याचे गायक, गायिका,संगीतकार, गीतकार, त्यात अभिनय करणारे कलाकार हे ही आवडतातच की!! […]

आयुष्याच्या एका वळणावर …

आयुष्याच्या एका वळणावर … – लेखक – निलेश बामणे एका बागेमध्ये एक साठीचा पुरुष ( प्रणय ) जॉगिंग करत असतो, जॉगींग करता करता घामाघुम झालेला तो घाम पुसण्यासाठी बागेतील एका बाकावर बसतो बाकावर बसल्यावर समोरून जॉगिंग करत जाणार्‍या सुंदर तरूणीकडे तो एक टक पाहात असतो इतक्यात त्याच्याच वयाचे दोन पुरुष त्याच्या दिशेने त्याच्याकडे पाहात जॉगिंग  करत येत […]

पेटीमास्तर धर्मबुवा तळपे

धर्माबुवा तळपे म्हणजे जुन्या काळातील भजनसम्राट. जबरदस्त दैवी आवाज व तितकेच हार्मोनिअमची मधुर सुरावट.धर्माबुवांना ओळखत नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही.. आंबेगाव, खेड व मावळ तालुक्यात जुने लोक त्याना पेटीमास्तर या नावानेच ओळखतात. अजूनही त्यांच्या भजनाचा विषय निघाला की लोक भरभरून बोलतात. त्यांचे कौतुक करतात. असा पेटीमास्तर पुन्हा होणार नाही असे बोलतात. […]

आधुनिक लाक्षागृहे

अभय गुजर गगनचुंबी इमारतींतील ‘अग्नी सुरक्षा’ ही नेहमीच चिंतेची बाब असते. नुकत्याच लागलेल्या ‘लोटस बिझनेस पार्क’मधील आगीच्या तांडवात ही बाब प्रकर्षाने ऐरणीवर आली आहे. अग्निशमन यंत्रणांच्या नियमांच्या अंमलबजावणीतील पळवाटा शोधण्याच्या वृत्तीमुळे अशा इमारतींत वावरणाऱ्या माणसांना धोका निर्माण झाला आहे. याच अनुषंगाने या ‘आधुनिक लाक्षागृहां’चा घेतलेला हा जळजळीत लेखाजोखा… […]

संस्कृत साहित्यातील कथा – क़मांक १ – अभिज्ञानशाकुंतलम्

नवीन मालिकेत संस्कृत साहित्यातील काही नाटकांच्या, काव्यातील किंवा गद्यातील कथा सांगणार आहे. ह्यापूर्वी मी मृच्छकटिक नाटकाची कथा आपल्याला सादर केली होती. संस्कृत साहित्य म्हटल्यावर नेहमीच पहिले नांव कालिदासाचे येते. “पुरा कविनां गणनाप्रसंगे कनिष्ठीकाधिष्टीत कालिदास:। ततस्तत्तुल्यकवेर्भावात् अनामिका सार्थवती बभूव॥ पूर्वी श्रेष्ठ कवींची गणना करतांना करंगळीवर प्रथम कालिदासाचे नांव घेतले. मग त्या तोडीचा कवी न मिळाल्याने अनामिका हे […]

प्रेरणा कसदार कवितांची

मला पहिल्यापासूनच कलेची आवड होती. विशेषतः, चित्रपट, चित्रकला आणि कविता याबद्दल मला विशेष आकर्षण वाटायचं. वयाच्या बाराव्या, तेराव्या वर्षांपासून कविता सुचायला लागल्या. तेव्हा मी आचार्य अत्रेंचे मी कसा झालो? ‘ हे पुस्तक वाचले. […]

कर्मयोगी कीटक

मधमाश्या या आपल्या मित्र आहेत, हे आपल्याला ज्या दिवशी कळेल, त्या दिवशी आपले पुष्कळ हित होईल. सध्या त्यांना शत्रू समजून आपण आपले नुकसान करून घेत आहोत….. […]

श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबध्द – अध्याय सत्रावा – श्रध्दात्रयविभागयोग

इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी श्रध्दात्रयविभागयोग नावाचा सत्रावा अध्याय. […]

1 63 64 65 66 67 76
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..