अग्निसुरक्षा आपल्या हाती
‘नेमेची येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे सध्या नित्यनेमाने ठिकठिकाणी आगी लागत आहेत. त्यांमध्ये निवासी इमारतींपासून कारखान्यांपर्यंत सर्व प्रकारच्या इमारतींचा समावेश आहे. आगीमुळे प्रचंड वित्तहानी तर होतेच आहे; पण जीवितहानीही सुरू आहे. आगीनंतर बरीच चर्चा होते. सर्व प्रकारची माध्यमे विषय उचलून धरतात; पण हे सर्व तात्पुरते असते. चौकशी समिती नेमली जाते, शिफारशी केल्या जातात. […]