ध्यानी, मनी ते स्वप्नी.
माणसाला स्वप्ने पडत असल्याची नोंद ५००० वर्षांची तरी आहे. आधीही पडत होतीच असतील. जंगलात रहाणाऱ्या माणसालाही स्वप्ने पडत होतीच असतील की. कारण स्वप्न माणसाला आपोआप पडतात. कांही करावचं लागत नाही. अर्थात किमान झोपावं लागतेच म्हणा. तर ह्या आपोआप पडणाऱ्या स्वप्नांना तो आदिमानव कसा सामोरा गेला असेल ? घाबरला असेल ? त्याची स्वप्ने कशी असतील ? […]