पाऊलखुणा
जे जे स्कूल ऑफ आर्टस मध्ये असताना मला 1984 ला अंतरराज्य फोटोग्राफी स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळाले. दिल्ली येथे माझी फोटोग्राफी प्रदर्शनासाठी महाराष्ट्र राज्याने खास निवड केली. दिवस होता 28 ऑक्टोबर 1984 प्रदर्शनाचा विषय होता प्रौढ शिक्षा. या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यासाठी आल्या होत्या त्या वेळेच्या माननीय पंतप्रधान इंदिरा गांधी. त्यावेळी प्रत्येक राज्यातून आलेल्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरव केला गेला. त्यात माझा समावेश होता […]