वाढदिवस आणि जन्मोत्सव
लहानपणा पासूनच प्रत्येकाला आपल्या वाढदिवसाचं एक कौतुक आणि नावीन्य असत तो दिवस म्हणजे फक्त आपल्या साठी साजरा केला जाणार याची अपूर्वाई असते . आमच्या लहानपणी ती असायची पण अगदी साध्या सरळ पद्धतीने म्हणजे ज्या कोणाचा वाढदिवस असेल त्या दिवशी बाबा आम्ही आबा म्हणतो ते पेढे घेऊन यायचे ते आणले कि संध्याकाळचं देवाची दिवाबत्ती व्हायची मग स्तोत्र जप झाला कि बाबा देवाजवळ पेढे ठेवून पहिला पेढा ज्याचा वाढदिवस त्याला भरवायचे . […]