एका बेटावरचा हवेत उडणारा कोल्हा
1982 सालची गोष्ट. रात्रीचे दोन वाजले होते. ‘मर्लीन टटल’ नावाची वन्य प्राणीशास्त्रज्ञ पूर्व आफ्रिकेत झिंबाब्वेच्या नदीच्या गुडघाभर पात्रात जवळपासच्या वटवाघळांचा शोध घेत होती. तिने एक विचित्र आवाज ऐकला. वास्तविक परिसरात त्यावेळी सिंह, तरस याचे डरकावणे सतत चालू असायचे, जंगली म्हशी उंच गवतात स्वैर धूडगूस घालत होत्या. पण या कोलाहलात एक कर्कश्श आणि अगदी विचित्र आवाज घुमला. मर्लीनने आवाजाचा मागोवा घेतला पण तिला आवाजाचे उगमस्थान नीटसे शोधता आले नाही. […]