घास रोज अडतो ओठी
हॉलमध्ये तुफान गर्दी . सगळीकडे झगमगाट . फॅशनच्या नावाखाली काहीही परिधान केलेल्या ललना आणि फाटलाय की टेलर ने वाकडी तिकडी कैची चालवून शिवलेल्या वस्त्राला फॅशन म्हणून स्वीकारलेले पुरुष दागदागिन्यांचं प्रदर्शन. परफ्यूमचा बेशुद्ध व्हायला लावणारा घमघमाट. काहींच्या तोंडी, त्यांनाच केवळ सुमधुर वाटणारा अल्कोहोलचा सुवास. हातात कुणीतरी कोंबलेला पेढा, सुपारी आणि उरलेल्या अक्षतांचं काय करायचं या संभ्रमात असताना, […]