आज वर्षातील सर्वात लहान दिवस आहे. आज केवळ १० तास ४७ मिनिटे सुर्याचे दर्शन घडणार आहे. व उर्वरित तासांची रात्र असणार आहे. २२ डिसेंबर रोजी सुर्य सगळ्यात जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूला ‘विंटर सोल्सस्टाईल’ असे म्हणतात. या बिंदूवर सुर्य असताना हा दिवस वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र ठरते. दिवस व रात्रीचा कालावधी हा कमी अधिक होत असल्याचा अनुभव नेहमीच येतो. पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशाने कललेला असल्याने हे घडते. याचाच परिणाम म्हणून सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायणचा अनुभवसुद्धा येतो. कोणत्याही वस्तुच्या सावलीचे निरीक्षण केल्यास सूर्याचे दक्षिणायण व उत्तरायण सहज लक्षात येऊ शकतो. पृथ्वीवरील ऋतुसुद्धा अक्षाच्या कलतीच्या स्थितीमुळे निर्माण होतात. आकाशात वैष्विक आणि आयनिक वृत्ताचे दोन काल्पनीक छेंदन बिंदू आहे. यापैकी एका बिंदूत २२ मार्च रोजी सूर्य प्रवेश करतो, याला शरद संपात बिंदू असे म्हणतात, या दोन्ही दिवशी रात्रीचा व दिवसाचा कालावधी हा सारखाच असतो. २१ जून हा ग्रेगेरियन वर्षातील १७२ वा दिवस आणि लीप वर्षात १७३ वा दिवस असून हा विषुवृत्ताच्या उत्तरीय भागात सर्वात मोठा दिवस असतो. २१ जून या दिवसाचे कालमान जवळपास १४ तासांचे तर रात्रीचे कालमान १० तासांच्या जवळपास असते. खगोलीय घटनेप्रमाणे २१ जूनला पृथ्वी आपला गोलार्थ बदलवत असून या दिवसापासून सूर्याचे काल्पनिक दक्षिणायन होण्याला सुरूवात होते. हा क्रम २१ डिसेंबरपर्यंत चालते. तोच २२ डिसेंबर वर्षातील सर्वात लहान दिवस असून त्यानंतर सूर्याची उत्तरायण होण्याची प्रक्रिया सुरू होऊन ती २१ जूनपर्यंत चालत असते. पृथ्वी २४ तासात एक वेळा स्वत: फिरत असून २४ तासात दिवस-रात्र घडत असतात. त्याचप्रमाणे स्वत: भोवती फिरत असताना पृथ्वी ३६५ दिवसांत सूर्याभोवती एक फेरा लावत असते. म्हणून ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणे ३६५ दिवसांचा एक वर्ष मानला जातो. २१ जून नंतर वर्षातील १९३ दिवस उरले असतात. २१ जूनपासून सूर्याचे दक्षिणायन होण्याचे चक्र सुरू होत असून दिवस लहान आणि रात्र मोठी होण्याला सुरूवात होते. हा क्रम चालत असताना २३ सप्टेंबरला रात्र आणि दिवस दोन्ही समान म्हणजे १२-१२ तासांचे असतात. तसेच २२ डिसेंबरला पृथ्वी आपला गोलार्ध बदलून त्यानंतर सूर्याचे उत्तरायण क्रम सुरू होते आणि २३ मार्चला दिवस आणि रात्र समान १२-१२ तासांचे असतात. त्यानंतर दिवस मोठा होण्याचा क्रम सुरू राहत असून मार्चनंतर उन्हाळा व तापमान वाढत असतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना दर तीन महिन्यांत आपला गोलार्ध बदलण्याची प्रक्रिया करते. त्यामुळे या दरम्यान काही भाग सूर्याच्या सरळ रेषेत येतो, नंतर काही भाग निरकस दिशेत येतो. त्यामुळे एकाच वेळी पृथ्वीवरील काही भागात उन्हाळा तर काही भागात हिवाळा चालत असतो. पृथ्वीवर काल्पनिक रेखांचे जाळे आहेत. त्यातील आडव्या रेषांना अंक्षांश आणि उभ्या रेषांना देशांश म्हणतात. मधोमध शून्य अंशावरून गेलेली अंक्षाश रेखा विषुवृत्त असून उत्तरेकडे २३(१/२) अंशावर कर्कवृत्त आणि ६६(१/२) वर अर्काटीक वृत्त तर दक्षिणेकडेही एवढ्याच अंतरावर मकरवृत्त व अंटार्टिक वृत्त आहेत. उत्तरेकडील कर्कवृत्त हे भारताच्या मधोमध गेले असून २१ जूनला सूर्याची स्थिती कर्करेषेच्या सरळ रेषेत असून या वेळी प्रचंड तापमान वाढलेले असते. भारतात वेळेचे निर्धारण पृथ्वीवरील उभ्या काल्पनिक देशांश रेखांपैकी ८२(१/२) अंशावरील देशांश रेखा ही वाराणसी या शहराजवळून गेलेली आहे. भारताचे रोजच्या वेळा निर्धारण या ८२(१/२) वरील देशांश रेषेवर होत असते. हा वेळ संपूर्ण भारतात चालतो. यानुसारच घड्याळ्यातील वेळ निश्चित केली जाते. आजच्या दिवसाचा सूर्यास्त पाहण्यासाठी समुद्रकिनारी जगभरातील लोकं गर्दी करतात. आणि वर्षातील मोठी समजल्या जाणाऱ्या रात्रीचे स्वागत करतात. आज ६ वाजून ५ मिनीटांनी सूर्यास्त होणार आहे. तसेच आजपासून उत्तरायण प्रारंभ होत आहे. या दिवसाला हिवाळा अयन दिवस असेही म्हणतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
खूप छान माहिती दिली सर?
२२ डिसेंबर पासुन जर उत्तरायण सुरू होते ,तर
मकर संक्रांती पासुन ऊत्तरायण सुरू होते असे का म्हणतात?
Sanjiv ji really very important information. As I’m teacher it is very helpful for my students.
वरील माहिती खुपचं उपयोगी व ज्ञानवधक उपयुक्त आहे.