ऑलिम्पिकचे जनक बॅरन कुबर्टिन यांनी २३ जून १८९४ साली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना केली. त्या दिवसाच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस साजरा केला जातो. जगभरातील खेळाडूंना सर्वोत्कृष्ट बनण्यास प्रवृत्त करणे हा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस साजरा करण्याचा हेतू आहे. पहिला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस २३ जून १९४८ ला साजरा करण्यात आला. पोर्तुगाल, ग्रीस, ऑस्ट्रिया, कॅनडा, स्वित्झर्लंड, ग्रेट ब्रिटन, उरुग्वे, व्हेनेझुएला आणि बेल्जियम या देशांनी एकत्रित येऊन पहिला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आयोजित केला. तत्कालीन या संघटनेच्या अध्यक्षानी जगभरातील तरुणांना ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होऊन खेळाला त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्याचे आवाहन केले होते.
सध्या जगभरात करोना ने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. याचा फटका २०२०च्या ऑलिम्पिक स्पर्धांना देखील बसला होता. करोनाने सर्वच गोष्टी ऑनलाईन होत असल्याने या वर्षीचा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस हा डिजिटल पद्धतीने साजरा करणार आहे.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply