कासव हा एक उभयचर प्राणी आहे. कासवांचे आयुष्य १५० वर्षांपेक्षा जास्त असते. कासव हा जैव साखळीतील महत्त्वाचा घटक आहे. कासव साधारण सात प्रकारच्या जातीत आढळते.
भारतात मंदिरामध्ये देवतेपुढे असलेले कासव हेही असेच महत्वाचे मानले जाते. त्याचा संकेत आहे की कासव जसे बाह्य गोष्टींपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी आपले पाय, शेपूट, मान कवच्यामध्ये ओढून घेते, तसे देवतेचे दर्शन घेताना काम, क्रोध, मद,मोह,मत्सर,लोभ या मानवी दुर्गुणांना आत खेचून घेऊन मगच देवतेचे दर्शन घ्यावे.
जहाजातील तेल गळतीसारखे अपघात, यांत्रिक मासेमारीच्या जाळ्यात अडकून मृत्यू, मानवाकडून किनारी भागांचा विध्वंस, कासवांच्या पाठींचा दागिन्यांसाठी वापर, अशा अनेक कारणामुळे समुद्री कासवांची संख्या कमी होते आहे. कासवांच्या सातही प्रमुख प्रजाती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणूनच त्या प्राणिसंवर्धन आणि संरक्षण कायद्याच्या परिघात येतात. समुद्री कासवांना पकडणे बेकायदेशीर आहे.
आज जागतिक कासव दिन आहे
— मराठीसृष्टी टिम
Leave a Reply