![Velankar-23rd-Anniversary-NCP](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2022/06/Velankar-23rd-Anniversary-NCP-678x381.jpg)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना १० जून १९९९ रोजी झाली.
शरद पवार जे आज महाराष्ट्रातले सर्वाधिक करिष्मा आणि आवाका असलेले नेते आहेत. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षाच्या स्थापनेपासून सत्ता हे समीकरण सतत १५ वर्षे होते. पाच वर्षांच्या खंडानंतर गेल्या वर्षी राष्ट्रवादी पुन्हा राज्याच्या सत्तेत परतला. २३ व्या वर्षांत पदार्पण करीत असताना जवळपास पावणे सतरा वर्षे पक्ष सत्तेत आहे. लोकशाही आघाडी किंवा आता महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपद मिळाले नसले तरी गृह, वित्त, जलसंपदासारखी महत्वाची खाती पक्षाने भूषवत आहेत.
२१ वर्षांपूर्वी शरद पवार यांनी सोनिया गांधी परदेशी वंशाच्या (इटालियन) आहे म्हणून त्यांच्याकडे काँग्रेसचे नेतृत्व देण्यास विरोध केला होता. काँग्रेसचे नेतृत्व परदेशी नागरिकाकडे देऊ नये यासाठी शरद पवार यांच्यासह त्यांचे सहकारी पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी पक्षांतर्गत बंडखोरी करत सोनिया गांधींचा विषय लावून धरला आणि थेट सोनिया गांधींनाच आव्हान दिले. यानंतर काँग्रेसने शिस्तभंगाची कारवाई करत शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिख अन्वर यांचे निलंबन केले. काँग्रेसच्या निलंबनानंतर तात्काळ या तिघांनीही २१ जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. १९९९ मध्ये काँग्रेसपासून शरद पवार यांनी फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा राज्यात काँग्रेसचा प्रभाव ओसरून राष्ट्रवादी ही जागा घेईल, असा अंदाज वर्तविला जात होता. काँग्रेसची जागा आता राष्ट्रवादी घेईल, असा तेव्हा दावाही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात होता. १९९९ आणि २०१४ मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढले तेव्हा काँग्रेसचे जास्त आमदार निवडून आले. २००४ आणि २००९ मध्ये आघाडीत काँग्रेसचे संख्याबळ जास्त होते. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसला मागे टाकले. राष्ट्रवादीचे ५४ तर काँग्रेसचे ४४ आमदार निवडून आले. काँग्रेसची जागा घेण्याचे राष्ट्रवादीचे स्वप्न गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत साकार झाले.
महाविकास आघाडीची मोट बांधण्यात शरद पवार यांनी पुढाकार घेतला. शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येणे कठीण होते. परंतु शरद पवार यांनी काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांचे यासाठी मन वळविले. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पटवून दिले. शिवसेनेबरोबर हातमिळवणी करण्यास काँग्रेसमध्ये सक्त विरोध होता. पवारांमुळेच महाविकास आघाडीचा प्रयोग प्रत्यक्षात येऊ शकला.
सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये गृह, वित्त, जलसंपदा, उत्पादन शुल्क, आरोग्य अशी सारी महत्वाची खाती राष्ट्रवादीकडे आहेत. संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराला २३ व्या वर्धापन दिन निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply