नवीन लेखन...

पानिपतच्या महासंग्रामाची २६१ वर्षं

युद्धात मराठे हरले तरी त्यांनी दिलेल्या बलिदानाचे मोल कमी होत नाही त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे.

हाच तो काळा दिवस ज्या दिवशी पानिपतावर मराठ्यांची एक सबंध पिढी शहीद झाली होती सदाशिवराव पेशवे, विश्वासराव पेशवे, जनकोजी शिंदे, यशवंतराव पवार, तुकाजी शिंदे, समशेर बहाद्दर, इब्राहिमखान यांच्यासारखे असंख्य शूरवीर योद्धे शहीद झाले. १४ जानेवारी १७६१ हे भारताच्या इतिहासातील एक स्मरणीय आणि असामान्य वळण आहे. मराठा आणि अफगाणी सैन्यादरम्यान पानिपतच्या तिसर्याण लढतीत त्या दिवशी झालेला रक्तपात एवढा होता, की जगात कुठेही इतकी मनुष्यहानी एका दिवसांत झाली नसावी.

पानिपत ही एक भारतासाठी दिशादर्शक घटना होती. जर मराठे जिंकले असते तर ना इंग्रज बळावले असते किंवा ना हैदर अलीचा उदय झाला असता. कदाचित दिल्लीवर त्याचवेळी मराठ्यांचा भगवा झेंडा फडकला असता.पण असे घडले नाही .पानिपतच्या लढाईमुळे मराठी माणसात न्यूनगंड निर्माण न होता, तो मराठी अस्मितेचा उच्चांक ठरला पाहिजे. तो मराठी जनतेसाठी ऊर्जेचा, स्फूर्तीचा, निस्वार्थी देशभक्तीचा एक स्रोत व्हायला हवा. प्रत्यक्ष रणांगणात ठार झालेल्या अफगाणी शिपायांची संख्या कामी आलेल्या मराठय़ांच्या दीडपट होती, हा एकमेव घटक मराठा शूरत्वाची आणि ‘मोडेन पण वाकणार नाही’, या बाण्याची ग्वाही देतो.

पानिपत युद्ध मराठ्यांच्या पराभवाचे नसून शौर्याचे प्रतिक आहे, मराठ्यांनी दिलेल्या शब्दासाठी आणि राष्ट्ररक्षणासाठी एकाकी लढताना कशी झुंज दिली त्याचे ते उदाहरण आहे ,”बचेंगे तो और लढेंगे ” असे म्हणणारे दत्ताजी शिंदे पानिपत युद्धाच्या आधी शहीद झाले पण त्या वाक्यातून छत्रपतींचे स्वराज्य राखण्या वेळीचे सूत्र मात्र दिसून येते.

पानिपत येथे पहिले दोन युद्धे झाली होती, ज्यात मोघलांची सरशी झाली होती व भारतात मुघल सत्तेचा पाया घातला गेला होता. तिसरी लढाई अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली आणि महाराष्ट्रातील पेशव्यांत झाली.

पानिपत येथे झालेल्या तिसऱ्या युद्धाची पार्श्वभूमी.

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याला खंबीर वारस मिळाला नाही त्यामुळे मराठ्यांनी उत्तर भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली होती.

१७५० च्या दशकात मराठ्यांनी उत्तर भारतात बर्यावच मोठ-मोठ्या मोहिमा काढल्या. पार पाकिस्तानातील अटकेपर्यंत आपले साम्राज्य प्रस्थापित केले व ७ ते ८ शतके राज्य करण्यार्याा एकछत्री इस्लामी सत्तेला आव्हान दिले. थोरल्या बाजीरावाच्या कारकीर्दीपर्यंत उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते. परंतु भारताच्या सीमा ओलांडून मराठे येऊ लागल्याने भारता बाहेरील इस्लामी सत्तांना मराठ्यांना अंकुश घालणे गरजेचे वाटले. १७५८ मध्ये मराठ्यांनी दिल्लीवर कब्जा मिळवला व मुघलांना नाममात्र राज्यकर्ते बनवले. याच वेळेस अब्दालीचा मुलगा तिमुर शाह दुराणीला हाकलून लावले. मुस्लिम धर्मगुरुंनी याला आपल्या धर्मावरचे मोठे संकट मानले व मराठ्यांना प्रत्युतर देण्यासाठी आघाडी उघडण्याचे आव्हान केले. अफगाण सेनानी अब्दालीने याला होकर दिला. त्याने १७५९ मध्ये बलुच, पश्तुन व अफगाणी लोकांची फौज उभारली व उत्तर भारतातील छोट्या छोट्या चौक्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली व मराठ्यांशी उघड उघड वैर पत्करले. या संघर्षामध्येच मराठ्यांचा मुख्य सेनापती दत्ताजी शिंदे याची नजीबने अत्यंत क्रूर हत्या केली. साहजिकच मराठ्यांना याचे उत्तर देणे गरजेचे होते तसेच अब्दालीला हुसकावणे गरजेचे होते. नाहीतर उत्तर भारतात काही दशकात मिळवलेले वर्चस्व गमावण्याची भीती होती. म्हणून मराठ्यांनी पण १ लाखाहून मोठी फौज उभारली व पानिपतकडे कूच केले.

पानिपत युद्धात “लाख बांगडी फुटली , दोन मोती गळाले , २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणना नाही …!!” तरी पानिपत चे युद्ध मराठे राष्ट्र रक्षणासाठी लढले हे महत्वाचे आहे, मराठ्यांनी अब्दालीला असा तडाखा दिला कि परत त्याने दिल्लीकडे पाहण्याचे धाडस केले नाही.

हरयाणा राज्याचा कर्नाल जिल्ह्यातील पानिपत या ऐतिहासिक स्थळी झालेल्या तीन प्रसिद्ध लढाया लढल्या गेल्या ते ठिकाण दिल्लीच्या वायव्येस सु. ८५ किमी. वर दिल्ली-अंबाला हमरस्त्यावर आहे.

पानिपत हे ठिकाण गेल्या सहस्त्रकात फारच गाजलेले आहे. इथे लढल्या गेलेल्या तीनही लढायात स्थानिक राज्यकर्त्यांची अपरिमित हानी झाली आणि परकीय आक्रमकांचे विजय झाले. त्यामुळे पानिपतची रणभूमी ही परधार्जिणी आहे असे म्हटले जाते.

“पानिपत १७६१” मध्ये त्रं.शं. शेजवलकर लिहितात, ” पानिपतच्या युध्दामुळे सिध्द झालेली महत्वाची गोष्ट ही की, मराठे हिंदुस्तानचे राज्यकर्ते म्हणुन वागत होते, केवळ लुटारु म्हणुन दुसऱ्या लुटारुंशी लढले नाहीत.हिंदुस्तानात सत्ताधिश कोणी व्हावयाचे या बद्दल वाद असो,पण हे राज्य हिंदी रहिवाश्यांचेच असले पाहीजे व तेच येथिल राज्यकर्ते राहिले पाहीजेत ,या तत्वासाठी मराठे पानीपतास लढले.”

गोविंदाग्रज पानिपत संग्रामाचे वर्णन करताना म्हणतात.

कौरव – पांडव संगरतांडव द्वापारकाली होय अती !
तसे मराठे गिलचे साचे कलित लढले पानपती !!

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..