दिनांक २९ जानेवारी, २००६ – प्रवासी भारतीय संघाचा पाकिस्तानमधील तिसरा कसोटी सामना.क्रीडांगण : नॅश्नल स्टेडिअम, कराची.
भारतीय कर्णधार राहुल द्रविडने नाणेफेक जिंकून बोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.पहिले षटक : गोलंदाज इरफान पठाण.पहिले चार चेंडू सलमान बट्टला. कोणत्याही चेंडूवर धाव नाही. चौथ्या चेंडूवर सलमान बट्ट झेलबाद. झेल्या राहुल द्रविड.
पुढचा फलंदाज युनिस खान.षटकातील पाचव्या चेंडूवर युनिस खान पायचित ! पाकिस्तान २ बाद शून्य.
पुढचा फलंदाज मोहम्मद युसूफ. (धर्मांतरापूर्वीचा युसूफ योहाना)षटकातील अखेरच्या चेंडूवर युसूफ त्रिफळाबाद.
इरफान पठाणचा गोलंदाजीतील त्रिक्रम पूर्ण. हरभजन सिंगनंतर कसोट्यांमध्ये त्रिक्रम (हॅट-ट्रिक) करणारा एकमेव भारतीय गोलंदाज.
कुठल्याही कसोटी डावाच्या पहिल्या षटकामध्ये ‘पूर्ण’ झालेला हा पहिला त्रिक्रम होता. वसिम अक्रमने श्रीलंकेविरुद्ध ढाक्यात डावाच्या पहिल्या षटकाच्या अखेरच्या दोन चेंडूंवर दोन बळी मिळविले होते आणि पुढच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरही बळी मिळवून त्रिक्रम पूर्ण केला होता.
श्रीलंकेच्या नुवान झोयसाने डावाच्या दुसर्या षटकात त्रिक्रम साधलेला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध हरारेत.
एदिसांमध्ये पहिल्या षटकात त्रिक्रम साधणारा एकमेव गोलंदाजही पाचूच्या बेटांवरचाच आहे : चमिंडा वाज. बांग्लादेशाविरुद्ध पीटर्मारित्झबर्गमध्ये.
चलते है वापस कराची के नॅश्नल स्टेडिअम पर…
पाकिस्तान की पहली पारी २४५ रनों पर सिमट गई । पठान ने पारी में पांच विकेट लिए । आंठवें नंबर पर उतरे विकेटकीपर कमरान अक्मल ने शतक जड़ा । वीवीएस लक्ष्मण ने कप्तान द्रविड़ के साथ भारतीय जवाब आरंभ किया लेकिन पाकिस्तान को पहली पारी के आधार पर सात रनों की बढ़त मिली ।
दूसरी पारी में पाकिस्तान का कोई भी बल्लेबाज रन बनाने से नहीं चूका और ५९९ के विशाल स्कोर पर कप्तान युनिस खान ने पारी समाप्ती की घोषणा की । ६०७ रनों का लक्ष्य हमेशा भारत की पहुँच के बाहर था । २६५ के स्कोर पर भारत की पारी सिमटी, जिसमें युवराज सिंग का १२२ रनों का योगदान रहा । ये १२२ रन केवल १४४ गेंदों पर आए थे ।
इस जीत के साथ पाकिस्तान ने तीन मैचों की यह शृंखला १-० से अपने नाम कर ली ।
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply