नवीन लेखन...

मधुमेहींसाठीचा आहार

मधुमेहींनुसार हा विकार कर्करोगापेक्षा धोकादायक आहे. या विकाराने तुमच्या दैनंदिन दिनचर्येवर परिणाम होतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार खाऊ शकत नाही. ज्यांनी आपले आयुष्य चपाती, पराठा, आमटी आणि भात खाण्यात घालवले आहे, ते अचानक काहीच खाऊ शकत नाहीत. आयुष्यात झालेल्या या नव्या बदलांमुळे खूप मानसिक समस्या निर्माण होतात. आपल्या शरीरासाठी काही पदार्थ न खाणे हेच योग्य आहे, हे स्वीकारण्यास वेळ लागतो. कारण त्यांचे स्वादुपिंड इन्सुनिलची निर्मिती करणे थांबवते. शरीरात केवळ ग्लुकोज (शर्करा) तयार होत असल्याने अनेक समस्या उद्भवतात. आपण या लक्षणांना मधुमेह असे म्हणतो. मूळात स्वादुपिंडामधून होणारा स्त्राव हा यकृतातर्फे नियंत्रित केला जातो, म्हणूनच मधुमेह हा यकृताचा विकार आहे. असे काही पदार्थ आहेत, जे यकृताच्या कार्यक्षमतेत सुधारणा घडवून आणतात. कडीपत्त्यामध्ये खूप चांगले गुणधर्म असतात. दिवसातून तीनवेळा कडीपत्त्याची ४-५ पाने खाल्ली तर यकृताच्या कार्यक्षमतेत सुधारणा होते. सकाळी उठल्यावर अर्धा चमचा तुळशीच्या बिया, मोड आलेली कडधान्ये, दही आणि तूप खाल्याने यकृत अधिक कार्यक्षम होते. मधुमेहींनी साखर, दूध, प्रिझर्व्हेटिव्हज (पदार्थ नासू नयेत, यासाठी घालण्याचा पदार्थ) आणि अधिक मेद असलेले पदार्थ टाळावेत. मधुमेही भात, बटाटा आणि केळे इत्यादी खाऊ शकतात, असे शेकडो गैरसमज मधुमेहींच्या आहाराबद्दल आहेत. पण हे पदार्थ योग्यवेळी आणि योग्य संयोगासह खाल्ले तरच चालू शकतात. सुमारे तीन तासांची भूक भागेल, असा आरोग्यदायी न्याहारी, दुपारचे आणि रात्रीचे जेवण आहार मधुमेहींनी घ्यावा. क्रॅशन डाएट (लवकर परिणाम मिळविण्यासाठी केलेले आहार नियोजन) करू नका, कारण ते जास्त अपायकारक ठरू शकेल.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

मधुमेहींसाठी पाककृती
गव्हाच्या दलियाचा उपमा
साहित्य- २ वाट्या दलिया, १ वाटी खोवलेला नारळ, मीठ, १ वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, १ बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, १ टी. स्पू. गरम मसाला, २ हिरव्या मिरच्या, ४-५ लसणाच्या पाकळ्या आणि १ टी. स्पू. साखर.
कृती – हिरव्या मिरच्या आणि लसणाची पेस्ट बनवावी. दलियामध्ये चार वाट्या पाणी, मीठ-मिरची लसूण पेस्ट, गरम मसाला आणि साखर घालावी. हा दलिया कुकरमध्ये शिजवून घ्यावा. शिजल्यावर दलियात खोवलेलं नारळ आणि थोडं पाणी टाकून तो वाफवून घ्यावा. दलियाचा उपमा वाढताना त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर टाकून खाण्यास द्यावा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

मशरूम बार्ली रिसोटो
साहित्य- १ कप भिजवेलेली बार्ली, १ टीस्पून ऑलिव्ह तेल,१ चिरलेला कांदा,१/२ कप चिरलेली लीक (कांद्यासारखी फळभाजी), १ लवंग, बारीक तुकडे केलेली लसूण,काही स्प्रिग्स रोसमेरी पाने,काही स्प्रिग्स थीम पाने, ३ कप भाज्यांचे स्टॉक (पनीर पाणी), १ टीस्पून चिली फ्लेक्स,टोबॅस्को सॉसचा एक डॅश, स्वादानुसार मीठ आणि काळी मिरी पावडर.
कृती:- जाड तळ असलेल्या कढईत ऑलिव्ह तेल तापत ठेवा. त्यात कांदा, लसूण, लिक्स घालून परतवा. त्यानंतर त्यात मशरूम घालून व्यवस्थित परतवा. आता त्यात बार्ली आणि स्टॉक घालून व्यवस्थित मिश्रण करा. कढई झाकून ठेवून हे मिश्रण सुमारे १० मिनिटे शिजू द्या. अधूनमधून पळी फिरवा. आवश्यकता असल्यास थोडा अजून स्टॉक घाला. बार्ली शिजल्यावर त्यात टोबॅस्को, परमेसन (एक प्रकारचे पनीर), चिली फ्लेक्स, रोझमेरी, थाइम, मीठ आणि काळी मिरी घाला. त्याचे व्यवस्थित मिश्रण करा आणि त्यावर लसणाची पात घालून वाढा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

लिंबू आणि कोथिंबीरीचे सूप
साहित्य- स्टॉकसाठी लेमन ग्रासचे दोन तीन धुतलेले तुकडे, उभ्या चिरलेल्या 1-2 लाल मिरच्या, इतर घटक- १/४ कप गाजराचे काप, १/४ कप मशरूमचे काप, १/४ कप बारीक चिरलेला कोबी, २ चिरलेल्या कांद्याच्या पाती,मीठ आणि काळी मिरी पावडर स्वादानुसार.
कृती:- लेमन ग्रास आणि मिरच्या ३ कप पाण्यात टाकून १५ मिनिटे उकळू द्या. हे मिश्रण गाळून बाजूला ठेवून द्या. थोडेसे पाणी घालून कांद्याची पात परतवून घ्या. त्यात कोबी, मशरूम आणि गाजर घालून 2 मिनिटे शिजवा. त्यात स्टॉक ओतून भाज्या मऊ होईपर्यंत उकळा. त्याच्यासोबत मीठ, काळी मिरी पावडर आणि लिंबू देऊन कोमट स्थितीत वाढा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

कोबीचे रोल
साहित्य- कोबीची ५-६ पाने,एक कप बारीक चिरलेल्या भाज्या (गाजर, फरस्बी, फ्लॉवर, मटार),अर्धा कप बारीक चिरलेला कांदा, अर्धा कप टोमॅटोची ग्रेव्ही, २५ ग्रॅम पनीर/ मोड आलेली कडधान्ये, २ टीस्पून तेल,मीठ आणि मिरी पावडर स्वादानुसार.
कृती:- पाण्यात मीठ टाकून कोबीची पाने १ मिनिटापर्यंत शिजवून घ्या. पाणी पूर्ण काढून टाका.
तेल तापवा. काही सेकंद कांदा परतवा. त्यात हिरव्या मिरच्या घालून पुन्हा एकदा काही सेकंद परतवा. त्यात भाज्या, मोड आलेली कडधान्ये, मीठ आणि मिरी पावडर घाला. भाज्यांचे हे मिश्रण कोबीच्या कोबीच्या प्रत्येक पानावर ठेवा, वरून थोडीशी टोमॅटोची ग्रेव्ही घाला. प्रत्येक पान गुंडाळून घ्या आणि ते तूप लावलेल्या बेकिंग ट्रेमध्ये ठेवा. शिल्लक राहिलेली टोमॅटो ग्रेव्ही उकळून घ्या आणि ती रोल्सवर ओता.. ओव्हनमध्ये 225 अंश सेल्सिअस तापमानावर 10 मिनिटे ठेवा आणि गरगरम खायला द्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

राजगिरा डोसा
घटक – रात्रभर भिजवून ठेवलेला 1/2 कप राजगिरा, १/२ कप चणा डाळ ४-६ तास भिजवलेली, १-२ हिरव्या मिरच्या, बारीक तुकडे केलेल्या (आवश्यकता असल्यास) स्वादानुसार मीठ, दीड टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर,शिजविण्यासाठी तेल.
कृती:- राजगिरा, चणाडाळ, हिरव्या मिरच्या आणि मीठ एकत्र करून त्याचे मिक्सरमध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून मिश्रण करून घ्यावे. ते बाऊलमध्ये काढून त्यात कोथिंबीर घालावी आणि व्यवस्थित मिसळून घेऊन, डोसा घालण्यासाठी योग्य असे मिश्रण तयार करावे.
नॉन स्टिक तव्यावर पातळ डोसे घालावेत. हिरवी चटणी आणि सांबार यांच्यासह ते खायला द्यावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..