विनोदमूर्ती प्रकाश इनामदार आणि नृत्यबिजली जयमाला इनामदार ह्यांचे मनमुराद हसायला लावणारे वगनाट्य “गाढवाचं लग्न” प्रकाश इनामदार, जयमाला इनामदार, नंतर मोहन जोशी, सविता मालपेकर यांच्या अफलातून अदाकारीनं हे नाटक गाजलं आहे.
वगनाट्य : गाढवाचं लग्न
नावाप्रमाणे साधा भोळा असा सावळ्या कुंभार,जो माती तुडवून मडकी घडवतो.गाढवाच्या जीवावर पोट भरणारा आणि गाढवालाच लेकराप्रमाणे जपणारा.सावळ्या कुंभाराला जन्म दिला तो श्री.हरिभाऊ वडगावकर ह्यांनी.एक लेखक म्हणून लेखणीतून सावळ्याला उतरवला खरा पण त्याच सावळ्यामध्ये प्राण फुकून जिवंत करणार अभिनेता ठरला प्रकाश इनामदार. ती भूमिका स्वतःपासून वेगळी न ठेवता एकरूप बनून अजरामर बनून गेले.
इथे अजून एक उल्लेख केल्या वाचून राहणार नाही सगळ्यात पहिला सावळ्या कुंभाराचा मान मिळाला श्री.दादू इंदुरीकर ह्यांना..पण त्या सावळ्याला जनसामान्यात पोहचवणारा आणि लोकांची दाद घेऊन जाणारा कलावंत ठरला प्रकाश इनामदार… ह्या उल्लेखनीय कलाकृती जी सामान्यान पर्येंत पोहोचवली आणि काही क्षण का होयीना हसवता हसवता कोपरखळी मारून लोकांना त्या सावळ्याच्या निरागस भोळ्या स्वभावाच्या प्रेमात पाडून गेली त्याबद्दल ह्या तीनही नट श्रेष्टांना मनाचा मुजरा…!!
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply