पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची स्थापना ११ ऑक्टोबर १९८२ रोजी झाली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा ३९ वर्षातला प्रवास प्रगतीच्या दिशेने जाणाराच आहे. मग सुरवातीला या शहराची औद्योगिक शहर ओळख होती या महानगरपालिकेने अल्पावधीत मोठी प्रगती केली आहे. औद्योगिक नगरी व आयटी हब म्हणून प्रसिद्ध असलेले हे शहर लाखो कामगारांना उपजीविका पुरवते.
पिंपरी-चिंचवड नगरपालिकेची स्थापना लोकनेते आण्णासाहेब मगर यांनी ४ मार्च १९७० साली पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी-निगडी ही गावे एकत्र करून केली. शासकीय समितीने १९७० ते १९७८ पर्यंत कारभार केल्यानंतर २० मार्च १९७८ मध्ये नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली. डॉ.श्री. श्री. घारे यांना पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून काम करण्याचा बहुमान मिळाला. त्यानंतर १९ ऑक्टोबर १९८२ मध्ये महाराष्ट्र शासनाने त्यानंतर लोकसंख्येच्या निकषानुसार या नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर केले. यावेळी काही नविन गावे समाविष्ट केली. या महानगरपालिकेची पहिली निवडणूक १९८६ साली झाली. त्यानंतर १९९२,१९९७, २००२, २००७, २०१२,२०१७ साली पंचवार्षिक निवडणुका झाल्या.
आशिया खंडातील श्रीमंत पालिका म्हणून शहराला लौकिक मिळाला आहे. ३९ वर्षांच्या या वाटचालीत शहराने ग्रीन सिटी, बेस्ट सिटी, क्लीन सिटी, स्मार्ट सिटी अशी बिरुदे मिळवल्यानंतर आता पिंपरी चिंचवड शहराची मेट्रो सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. पिंपरी महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक १९८६ साली झाली. आतापर्यंतच्या महापौरपदासाठी मराठा समाजाला सर्वाधिक व त्याखालोखाल माळी समाजाला संधी मिळाली. वाघेरे पितापुत्रांनी, तर लांडे पती-पत्नींलनी हे पद भूषवले आहे. आर.एस. कुमार व बहल हे अमराठी महापौर झाले आहेत. फरांदे पहिल्या महिला महापौर ठरल्या होत्या.
कोरोना विषयक नियम पाळून या वर्षीचा महानगरपालिकेचा वर्धापन दिन साजरा करावा असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply