नवीन लेखन...

3M – जपानी संकल्पना

मुदा मुरा मुरी

जपान देशाने अनेक तंत्र आणि सक्सेस मंत्र साऱ्या जगाला दिले आहेत हे आपण जाणतोच. ते साऱ्या जगाला पटले आणि कौतुकास पात्र ठरले ते ह्या जपानी नागरिकांच्या उत्तरोत्तर प्रगतीने आणि सातत्याने!

ह्या लेखात आपण पाहुया अशाच एका संकल्पने बद्दल. काईझेन हे एक जगप्रसिद्ध असलेले व्यवस्थापन तंत्र आहे. जपान देशांकडून जगाला मिळालेल्या काही धड्यांमधील असलेले हे तंत्र आपल्याला परिचयाचे आहेच. गुणवत्ता वाढीसाठी सर्रास याचा वापर केला जातो.

ह्याच तत्वाचा भाग असलेले ‘३मु’ (इंग्रजीमध्ये 3M) जपान्यांनी त्यांच्या रोजच्या कामात आणि वागणुकीतसुद्धा आत्मसात केलेले आहेत. कळत नकळत त्यांच्या कामांमधून आणि रोजच्या जीवनशैलीतून हे पहायला मिळते.

एकदा एका जपानी सहकाऱ्याने साध्या आणि सोप्या भाषेत ह्याचा अर्थ मला समजावून सांगितला, तो आज मी आपल्याला सांगते. जपान्यांच्या इतकं अगदी वाहून घेऊन नाही तर अगदी काही प्रमाणात का होईना शक्य तेवढा ह्या तंत्राचा वापर आपण आपल्या रोजच्या जीवनात नक्कीच करू शकतो.

आधी थोडक्यात काय आहेत हे ‘३मु’ ?

तंत्रज्ञाना मध्ये अग्रेसर उत्तम कंपन्यांमधील एक ‘टोयोटा’ ह्यांची ही मूळ कन्सेप्ट आहे.बऱ्याच उत्तम मार्गदर्शक वेबसाईट वरती, पुस्तकांमध्ये ह्या बद्दलची शास्त्र शुद्ध माहिती उपलब्ध आहे.

अर्थ :

१. मुदा(Waste): वाया, निष्फळ, फुकट

२. मुरा(Uneven) :असमान, अनियमित

३. मुरी (Impossible) :अशक्य, अवास्तव

सर्वात जास्त waste होणारी गोष्ट Time. तो बहुमूल्य आहे. ‘वेळेचा अपव्यय टाळणे’ ही क्रिया बरीच ‘मुदा(Waste)’ कामे करण्यापासून प्रवृत्त करते. रोजच्या उदाहरणावरूनचं अगदी साध्या भाषेत सांगायचे तर, एखादे काम सुरूवात करताना नेहमीच स्वत:ला काही प्रश्न विचारणे गरजेचे आहे.

साधा ‘का?’ हा प्रश्नच घ्या! लहान मुले उत्सुकतेपोटी रोज कितीतरी प्रश्न विचारतात आणि त्यांचं समाधान होईल अशी उत्तरे मिळे पर्यंत त्या प्रश्नांचा पाठपुरावा करत राहतात. त्यांच्या कडे पाहूनच मला नेहमी, “आपण सुद्धा असं का करत नाही ?” असं वाटतं. एखादी गोष्ट करण्यामागे काहीतरी कारण आणि अर्थ नसेल असं फार कमी प्रमाणात होत. काहीतरी सुरूवात करण्याआधीच ते काम /ती गोष्ट  वाया तर जाणार नाही ना ?

आपला वेळ सत्कारणी लागतोय ना ? हे शक्य तेवढं आपण नक्कीच आगाऊ विचार करू शकतो. कारण बाकी कुणापेक्षा सुद्धा आपल्या स्वत:ला पटेल असं कारण मिळाल म्हणजे झालं, ठरवलेली गोष्ट वेगाने पुढे गेलीच म्हणून समजा. ह्यातून मग काही निष्फळ (मुदा) होणारच नाही.

पुढे त्यांनी समजावलं ते म्हणजे ‘मुरा(Uneven)’ हे मुरा असंय ना की त्याच्यामुळे एखादे काम मुदा होऊ शकते. म्हणतात ना (Unevenness is the enemy of balance and stability)अ समानता संतुलन आणि स्थिरतेचा शत्रू आहे. कामामध्ये संतुलन असणे खूप महत्त्वाचे आहे हे आपण जाणतोच. त्यामुळे एकदा ठरवलं काय करायच आहे आणि त्या मागचं कारण स्पष्ट झाल्यानंतर आपोआपच ती कृती अथवा ते कार्य वास्तवात आणण्यासाठी धडपड करणे प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.
एखाद्या कामात कधी, केव्हा, कुठे, कसे? हे बाकीचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे मिळवणे हा टास्क पूर्ण केला की मुरा सुद्धा होणारच नाही. नाही का?

आता पाहू सगळ्यात महत्त्वाचं ‘मुरी (Impossible)’ बद्दल.

एखादी ठरवलेली गोष्ट योग्य प्रमाणात ठरवलेल्या वेळेत पूर्ण करणे महत्त्वाचे. मुरी कमी करणे हे ह्या मध्ये सर्वप्रथम विचारात घेतले पाहिजे. कोणत्याही गोष्टींमध्ये पुढे जाण्यासाठी मुरी करणे हे सगळ्यात हानिकारक आहे. जपानी सहकाऱ्याने  पुढे सांगितलं आम्ही मुरी या शब्दाचे भाषांतर करतो, ‘मशीन, लोक/व्यक्ती आणि एखाद्या प्रक्रियेवरील ताण (ओव्हरबर्डन)’. कारण कोणत्याही गोष्टींवरचा ओव्हरलोड उत्पादन खंडित करून, ते पूर्णपणे अवास्तव करण्यास उद्युक्त करतो. आपण म्हणतो ना ‘अति तेथे माती’ तसाच मुरीचा अर्थ आहे.

सध्याच्या परिस्थितीचा आहे तसा स्वीकार न करता त्यात काही सुधारणा करता येईल का ? याचा विचार करणे म्हणजेच ‘काईझेन’. व्यावसायिक दृष्ट्‍या पहिल्यास असे करण्यासाठी खूप गुंतवणूक (खर्च) करावा लागत नाही.आपल्या दैनंदिन कामात छोट्या छोट्या सुधारणा करून फार मोठा परिणाम कालांतराने घडवता येतो.काईझेनचा सरळ सोपा अर्थ म्हणजे चांगल्या साठी केलेला बदल.इंग्रजीमध्ये सांगायचे झाले तर Change for the Better.सातत्याने सुधारणा करणे म्हणजे Continuous Improvement हे महत्त्वाचे.

चला तर मग आपण सुद्धा शोधूयात रोजच्या कामातले ‘काईझेन’ आणि संलग्न ठेवूयात विचार शक्ती ‘३मु’ तंत्राशी!

— प्रणाली भालचंद्र मराठे

गुगल वरून साभार:

Kaizen: https://en.wikipedia.org/wiki/Kaizen

Toyota 3M Model : https://www.mudamasters.com/en/lean-production-theory/toyota-3m-model-muda-mura-muri

Avatar
About प्रणाली भालचंद्र मराठे 17 Articles
मी सध्या जपान मध्ये वास्त्यव्यास असून ,येथे जपानी भाषेची भाषांतरकार म्हणून काम करत आहे. जपानी भाषेमध्ये जितके नावीन्य आहे तितकेच या देशामध्ये आणि यादेशातील रहिवाश्यांमध्ये. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या जपान देशाचे सौंदर्य अलौकिक आहे. जे मी आपणापर्यंत माझ्या लेखनाद्वारे पोहोचवू इच्छिते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..