मराठी साहित्यावर आधारित अथवा माध्यमांतर करीत हिंदी चित्रपट पडद्यावर आले आहेत हे विशेष उल्लेखनीय आहे. जयवंत दळवी यांच्या साहित्यावर आधारित रवींद्र धर्मराज दिग्दर्शित ‘चक्र ‘ हा चित्रपटही असाच उल्लेखनीय आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनास ४१ वर्षे पूर्ण झाली आहेत.
मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर नाझ हे होते. या चित्रपटाची निर्मिती एनएफडीसीच्या वतीने करण्यात आली आहे. मुंबईतील झोपडपट्टीतील जीवन संघर्ष या चित्रपटात अतिशय प्रभावीपणे साकारला आहे. या चित्रपटात स्मिता पाटील (अम्माच्या भूमिकेत), नसिरुद्दीन शहा (लूका), कुलभूषण खरबंदा (अण्णा), अंजली पैंजणकर (चैन्ना) तसेच रोहिणी हट्टंगडी, रणजित चौधरी, सलिम घोष इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. विशेष म्हणजे अलका कुबलचीही या चित्रपटात भूमिका आहे. तेव्हा ती शाळकरी वयात होती. या चित्रपटाला ह्रदयनाथ मंगेशकर यांचे संगीत आहे. जीने मरने के चक्कर मे (पार्श्वगायक भूपिंदर सिंग), काले काले गहरे साये (लता मंगेशकर) , ओभी ऑखो मे (भूपिंदर सिंग), रात अंधेरी धूम मची (सुरेश वाडकर व रवींद्र साठे) या गाण्यांचा या चित्रपटात समावेश आहे. या चित्रपटातील मराठी ठसा विशेष जाणवतोय. काही वेगळे चित्रपट पाहू इच्छिणारे रसिकांमध्ये हा चित्रपट कायमच चर्चेत असतो.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply