नवीन लेखन...

45 दिवस ते 45 मिनिटे

स्वप्नील आणि स्नेहाचं ब्रेकअप होऊन चक्क 45 दिवस झाले होते. तो 46 वा दिवस होता.  दिवस मोजण्याच कारण एवढंच की स्वप्नील ने ते 45 दिवस अगदी 45 वर्ष झाल्यासारखे घालवले होते. त्या दिवशी न राहवता त्याने सकाळ पासून तिचा फोन ट्राय केला होता. पलीकडून काहीच रिप्लाय येत नव्हता.   कॉलेज ला जाताना तिला रस्त्यात  गाठायचं.  भेटून तिची माफी मागायचं. असं त्याने ठरवलं.  तो सकाळी  लवकरच बाईक घेऊन निघाला.  तिला भेटायच्या नादात पावसाळा असूनही रेनकोट न घेताच  तो निघाला. अशातच जोराचा पाऊस  सुरू झाला.    कशाचीही तमा न बाळगता तो भरधाव वेगाने  जात होता . ती कधी भेटेल एवढंच ध्येय होतं.  जशी बाईक पुढे जात होती  तसा तो फ्लॅशबॅक मध्ये गेला. मागील आठवणीत रमला. त्याच्या डोळ्यासमोर भूतकाळातील  प्रसंग उमटले. त्यांची ती पहिली भेट. त्याने  केलेलं प्रपोज. पहिल्यांदा जेव्हा  तिला गुलाबाचं फुल दिल… वगैरे वगैरे… सर्व त्याला आठवत होत. ऐन परीक्षा  तोंडावर  असताना तो जेव्हा आजारी पडला तेव्हा तिची झालेली घालमेल, त्याच्यासाठी  तिने आणलेला जेवणाचा डबा… सर्व सर्व त्याला आता आठवत होत.

एका शुल्लक कारणावरून त्याने तिच्याशी वाद घातला  होता.  म्हणून माफी मागण्यासाठीच तो आज तिला भेटणार होता. पावसाच्या सरी त्याला चाबकाच्या फटकाऱ्या प्रमाणे जाणवत  होत्या.  काही अंतर पुढे गेल्यावर त्याने रस्त्याच्या  कडेला  बाईक लावली. तिच्या नजरेस येणार नाही अश्या ठिकाणी उभा राहिला. थोड्या वेळाने ती येताना दिसली. त्याने आवाज दिला, “स्नेहा.…”

तिने मागे वळून पाहिले.  त्याला बघताच स्नेहा त्याला टाळून पुढे जाऊ लागली. स्वप्नील ने पुन्हा आवाज दिला,”स्नेहा प्लिज…ऐक ना…”

तिकडे  न पाहता ती  भराभर पुढे चालू लागली.

“स्नेहा प्लिज ऐक ना जरा, सॉरी ना… माझं खरच चुकलं ग.. मी तुझ्याशी वाद घालायला नको होता. मला माझी चूक कळलीय”.

ती  त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होती.  तो काही ऐकत नव्हता.

कंटाळून ती  रागात पण हळू स्वरात बोलली,”हे बघ स्वप्नील, तुझा आणि माझा आता काहीच संबंध उरला नाही.”

“पाऊस पडतोय, लोकं बघातायत, प्लिज तू  निघून जा”.

आपली बॅग आणि छत्री सावरत ती वेगाने चालू लागली . शेवटी  तो  तिथेच पावसात उभा राहीला. स्वप्नील च्या  डोळ्यातून  अश्रूंच्या धारा  वाहत होत्या. पावसाच्या सरींसोबत   त्या तशाच विरत होत्या. मनाची घालमेल सुरू झाली. आज नाही तर कधीच नाही असं त्याला वाटू लागलं.

त्याचं  खूप प्रेम होतं स्नेहावर. .  आज काहीही झालं तरी माफी मागीतलीच पाहिजे असं मनाशी ठरवलं. स्वप्नील ने बाईक स्टार्ट केली. पुन्हा तिच्या मागे निघाला.

“स्नेहा, प्लिज माझं ऐक ना,  अगं रागाच्या भरात माझ्याने त्या दिवशी बरं वाईट बोललं गेलं, पण खरंच माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे गं”.

“का?  मी नव्हतं केलं तुझ्यावर प्रेम ? पण  मी नाही रागाच्या भरात तुला अस भलतं सलतं बोलले ?  हे बघ, लोकं बघतात आपल्याकडे, उगाच तमाशा नको करू लोकांसमोर.”

“ मी निघून जाईन इथून.  एकदाच मला माफ कर. हवं तर तू बाईक वर बस, आपण एखाद्या ठिकाणी जाऊ आणि सविस्तर बोलू.  प्लिज बस ना बाईक वर”.

लोकांसमोर तमाशा नको म्हणून नाईलाजाने ती बाईक वर बसली. पावसाच्या सरी बरसतच होत्या. तीने  छत्री उघडण्याचा प्रयत्न केला पण बाईक चा वेग आणि वाहणाऱ्या हवेमुळे तिला छत्री उघडता आली नाही.

दोघेही बाईक वर अनोळख्या व्यक्ती प्रमाणे बसले होते. आपापल्या भूतकाळात डोकाऊन पाहू लागले.   त्या जुन्या आठवणी तिच्या  नजरे समोरून तरळत गेल्या.

ज्या दिवशी स्वप्नील ने प्रपोज केला तेव्हा तिने  नकार दिला होता. पण त्याने धीर सोडला नाही. उलट तिला सांगितले जो पर्यंत तू मला हो म्हणत नाही तो पर्यंत मी रोज बिना चपलेने कॉलेजला येत जाईल. सुरवातीला तिने सगळं हसण्यावारी नेलं. पण सलग 4 दिवस तो बिना शूज किंवा चपले शिवाय  कॉलेजला आला. तेव्हा मात्र तिच्याकडून त्याला होकार मिळालाच. तसा तिलाही तो आवडला होता. असंच एके दिवशी स्नेहाला आईस्क्रीम खावीशी वाटली .  स्वप्नील कडे पैसे नव्हते.  त्याने तिला वर्गातच थांबण्यास सांगितले. तडक तो बाहेर आला.  आता काय करायचं अशा विचारात असताना त्याला एक ट्रक रिकामा होताना दिसला. तो ट्रक जवळ गेला.  मालकाला म्हणाला, “ मी एकटाच हा ट्रक खाली करतो. तुम्ही फक्त मला 50 रुपये द्या”. ट्रक वाल्याने हसण्यावारी नेले . तोपर्यंत तो झपाझप गोण्या उतरवू लागला.  10 मिनिटात ट्रक रिकामा केला.  ट्रक वाल्याने  त्याला खुश होऊन 200 रुपये दिले.  त्यातील फक्त 50 रुपये त्याने  घेतले. त्याची आईस्क्रीम घेतली. नेऊन स्नेहाला दिली.

ही  घटना स्नेहा ला त्याच्या मित्रांनी बऱ्याच दिवसांनी  सांगितली .  तो प्रसंग आठवून  तिला हसू आलं.  तिने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला.

असे  अनेक प्रसंग तिच्या नजरे समोरून जात होते.

बराच वेळ  शांतता पसरली होती . कोणीच कोणाशी बोलत नव्हतं.  स्वप्नील च्या   डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. पावसाच्या सरींमध्ये त्या विरत होत्या.

आता तिलाच असह्य झालं.  तो जेवढा तिच्यावर प्रेम करत होता तेवढंच तिचंही त्याच्यावर प्रेम होतं. का कुणास ठाऊक तिने तिचा उजवा हात त्याच्या दिशेने उचलला. त्याच्या मांडीवर  ठेवला. पुढे सरकली.  त्याच्या पाठीवर डोकं ठेवलं. डोळे बंद केले आणि तशीच पडून राहिली. अश्रूंनी वाट मोकळी केली. तिचा बांध फुटला.  प्रेमाने रागावर विजय मिळवला होता. भरधाव वेगाने बाईक जात होती. हळूच तिने त्याला जवळ ओढलं आणि त्याच्या कानात कुजबुजली …. “शोणा…  लव यु ना…

— भैय्यानंद वसंत बागुल

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..