
३ मार्च १९७२ हा दिवस…. बॉम्बे टू गोवा या चित्रपटाला चित्रपटगृहात लागून ४५ वर्षे पूर्ण झाली.
एखाद्या ठिकाणी सहलीला जायचं असल्यास प्रवास हा आलाचं. या प्रवासाची साधनं वेगळी असू शकतात, परंतु एक बाब मात्र सामायिक असते. ती म्हणजे पिकनिकला जाताना लागणारी गाणी. उडत्या चालीची गाणी गाऊन सहलीतील प्रवासाचा शीण घालवण्याकडे सर्वांचाच कल असतो. या पिकनिकमधील गाण्यात आवर्जून म्हटलं जाणार गाणं म्हणजे ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटातील ‘देखा ना हाय रे सोचा ना हाय रे’ हे गाणं.
१९७२ साली मेहमुद यांनी त्याचा भाऊ अनवर अली व अमिताभ बच्चन यांच्यासाठी एस. रामनाथन यांच्या निर्देशनाखाली यांच्यासाठी नितांत सुन्दर कॉमेडी बॉम्बे टू गोवा हा सिनेमा कढला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन, अरुणा इरानी, महमूद, अनवर आली, नासीर हुसेन, शत्रुघ्न सिन्हा, केष्टो मुकर्जी, ललिता पवार, मनोरमा, मुकरी, सुंदर, किशोर कुमार या सारखे कलाकार होते. या सर्वानी चित्रपटात जो धुमाकुळ घातला आहे तो अप्रतिम, केष्टो यांचे नशेत गाड़ी लोटने, ललिता पवार यांचे अंगात आलेली बाई लाजबाब.
या चित्रपटातील गाणी …”देखा ना हाये रे सोचा ना हय रे रख दी निशाने पे जान ल ल ल लला .. कदमो पे तेरे निकले मेरा दम…..है बस यही अरमान ….” किशोर कुमार यांची अप्रतिम गाणी ….एव्हरग्रीन फ्रेश .. ‘ किशोर कुमार व लताजी यांची दोंन गाणी …”तुम मेरी ज़िंदगी मे कुच इस तराह से आये …” ‘दिल तेरा है मे भी तेरी हु सनम ..तेरे सर की कसम हो सनम, गीतकर राजेन्द्र कृष्ण, संगीत राहुल देव बर्मन यांची सर्व गाणी लोकप्रिय. आजही हा सिनेमा बघावा ….एकदम ताजे तवाने झाल्या सारखे वाटते.
मेहमूद यांनी, त्यांच्या अभिनय कौशल्याने शत्रुघ्न सिन्हा, अमिताभ बच्चन, अरुणा इरानी, पंचम आणि किशोर कुमार यांनी सुपर हिट केलेला “ऑल टाइम ग्रेट” ” बॉम्बे टू गोवा”
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ : इंटरनेट
Leave a Reply