या नाटकाचा पहिला प्रयोग १६ सप्टेंबर १९७२ साली मुंबईत झाला. हे नाटक माहिती नसलेला मराठी रसिक विरळाच. आपल्या लिखाणाने आणि नाटकांनी रसिकांच्या मनावर अनेक दशके अधिराज्य गाजवणारे साहित्यिक, संगितकार, अभिनेते, विज्ञानप्रेमी असे बहुरूपी व्यक्तीमत्त्व म्हणजे पु.ल.देशपांडे.यांनी लिहिलेले ‘वाऱ्यावरची वरात’ हे नाटक. या नाटकात पु.लं.नी लेखन, संगीत आणि दिग्दर्शन स्वत:च केले होते. त्यांनी केलेल्या नाटकांच्या सीडी बाजारात उपलब्ध आहेत. या नाटकात श्रीकांत मोघे, आशालता बाबगावकर,नीलम प्रभू, रमाकांत देशपांडे,लालजी देसाई अशा दिग्गज कलाकारांनी यात पु.लं. सोबत केले होते.
‘वाऱ्यावरची वरात’ चा किस्सा:
‘वाऱ्यावरची वरात’चा रवींद नाट्य मंदिरातला रात्रीचा प्रयोग. दुसऱ्या दिवशी बोहल्यावर चढायचे होते. लालजी देसाई आपले काम आटपून घाईघाईने निघाले. विंगेत उभे असलेल्या पुलंनी अंधारातच हात धरला आणि म्हणाले… ‘प्रयोग संपेपर्यंत थांब!’ लालजींना कळेना. प्रयोग संपला. पण पुलंनी पडदा पुन्हा उघडायला लावला. लालजींचा हात धरून ते त्यांना रंगमंचावर घेऊन आले आणि प्रेक्षकांना म्हणाले, ‘उद्या याची ‘वरात’ निघणार आहे, पण तो आजच ‘वाऱ्यावर’ स्वार होऊन आला आहे’…आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply