इंटरनेटच्या प्रसारामुळे ‘हे विश्वची माझे घर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आली असली तरी या जगाला एका कुटुंबाप्रमाणे बनवण्याचे श्रेय जाते ते फेसबुकला. या सोशल नेटवर्किंग साइटचा वापर करणा-यांची संख्या १८० कोटींहून अधिक असल्याने फेसुबक म्हणजे १८० कोटींहून अधिक लोकांचे एक कुटुंबच बनले आहे.
आज ४ फेब्रुवारी रोजी या सोशल नेटवर्किंग साइटला १३ वर्षे पूर्ण होत असताना फेसबुक वापरणारे त्याकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहत असतात. कोणाला ते विरंगुळ्याचे साधन वाटते तर कोणाला ते जास्तीत जास्त लोक जोडणारे आणि काळाच्या ओघात विसर पडलेल्या मित्रमैत्रिणींना पुन्हा जवळ आणणारे साधन वाटते. मार्क झुकरबर्ग हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना मार्कने आपले वर्गमित्र डस्टिन मोस्कोविट्ज, एड्युअर्डो सार्विन आणि ख्रिस ह्युजेस यांच्या सोबत फेसबुकची स्थापना केली. ४ फेब्रुवारी २००४ रोजी आपल्या हार्वर्ड वसतीगृह खोलीत झुकेरबर्ग, फेसबुक सुरू केली आहे. विशेष म्हणजे मार्क झुकरबर्ग हा हार्वर्ड विद्यापीठाचा ड्रॉप आउट आहे. पण या फेसबुकची ताकद ओळखून मार्क झुकरबर्गने त्यामध्ये वेळोवेळी कल्पक बदल केले आणि त्यामुळे या सोशल नेटवर्किंग साइटची लोकप्रियता वाढतच गेली. इंटरनेटमुळे जग ख-या अर्थाने जवळ आले असले तरी फेसबुकमुळे जग घट्ट जोडले गेले हे मान्य करावेच लागेल. गेल्या काही वर्षात या सोशल नेटवर्किंग साइटने जी लोकप्रियता मिळवली, तशी लोकप्रियता दुस-या कोणत्याही नेटवर्किंग साइटला मिळालेली नाही. सध्या फेसबुकला ट्विटर आणि तशाच प्रकारच्या इतर नेटवर्किंग साइट्सकडून स्पर्धा निर्माण झाली असली आणि फेसबुकच्या आधीही तशा प्रकारच्या वेबसाइट्स निर्माण झाल्या असल्या तरीही सोशल नेटवर्किंग ही संकल्पना लोकांमध्ये इतक्या जास्त प्रमाणात रुजवणारी फेसबुक ही पहिली वेबसाइट आहे आणि या वेबसाइटची वाटचाल थक्क करणारी आहे. एकुण १२ देशात फेसबुकची कार्यालयं आहेत. फेसबुकला मिळणाऱ्या जहिरातींमुळे फेसबुकला विनामुल्य सेवा देणं शक्य झालं आहे. झुकरबर्ग चा साधेपणाच हे त्याचे वैशिष्ट्य ठरले आहे. १८ मे २०१२ ला फेसबुकने सामान्य माणसाठी फेसबुकचे शेअर्स काढले आणि या शेअर्स नी बाजारात धुमाकूळ घातला. या शेअर्स मुळे फेसबुकला करोडोचा फायदा झाला. फेसबुकच्या कर्मचाऱ्यांची संख्या स्थापना झाली तेव्हा ४ होती आता ती १२ हजार ६०० च्या वर आहे.
कॅलिफोर्नियातल्या ‘मेन्लो पार्क’ इथं फेसबुकचं मुख्य कार्यालय आहे. गेल्या दोन वर्षात , फेसबुकने प्रचंड प्रतिष्ठा प्राप्त केले आहे. असा सामान्यातला असामान्य मार्क झुकरबर्ग आजच्या तरुण पिढीसाठी खराखुरा आयडल आहे. कंपनीत मार्क झुकेरबर्गची भागीदारी २४ टक्के, एसेल पार्टनरची १० टक्के, डिजिटल स्काय टेक्नॉलॉजीची १० टक्के, डस्टिन मोस्कोव्हिट्झची ६ टक्के, इडुअर्डो सॅव्हेरिनची ५ टक्के, सिएन पार्करची 4 टक्के, पीटर थिएलची ३ टक्के, ग्रेलॉक पार्टनर्सची १ ते २ टक्के, मायक्रोसॉफ्टची १.३ टक्के, ली का शिंगची ०.७५ टक्के व इंटरपब्लिक ग्रुपची ०.५ टक्के भागीदारी आहे. २४ ऑक्टोबर २००७ रोजी बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने फेसबुकमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी फेसबुकचे १.६ टक्के समभाग २४ कोटी डॉलरला विकत घेतले. याशिवाय माजी कर्मचारी व सेलेब्रिटिजचीही भागीदारी आहे. फेसबुकला सर्वाधिक महसूल जाहिरातींद्वारे मिळतो. मायक्रोसॉफ्ट फेसबुकची एक्क्लुसिव्ह पार्टनर असून ती कंपनीसाठी बॅनर अॅ डव्हर्टायझिंग करते. २००६ मध्ये कंपनीचा महसूल जवळपास ५२ अब्ज डॉलर होता. पुढील वर्षी १८८ टक्के वाढीसह तो १५० अब्ज डॉलरवर पोहोचला. २०१६ मध्ये महसूल २७६ अब्ज डॉलर आहे. २००८ साली इंग्लंडमधील १०२ वर्षे वयाच्या इव्ही बिन यांनी फेसबुकवर अकाउंट उघडले होते. त्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिकांनी फेसबुकवर अकाउंट उघडले. बिन या ट्विटरच्या सर्वाधिक वयाच्या उपयोगकर्ता होत्या. फेसबुकवर त्यांचे ४ हजार ९६२ मित्र, तर ट्विटरवर ५६ हजारांहून अधिक पाठीराखे होते. जुलै २०१० मध्ये त्यांचा मृत्यू झाला. फेसबुकवर त्यांच्या सन्मानार्थ अनेक फॅन पेजेस बनवण्यात आले.
फेसबुकवर एका उपयोगकर्त्याचे सरासरी १३० मित्र असतात आणि तो दर महिन्यास किमान ८ लोकांना मैत्रीचे आवाहन करतो.
१ ऑक्टोबर २०१० रोजी डेव्हिड फिन्चर दिग्दर्शित ‘द सोशल नेटवर्क’ चित्रपट प्रदर्शित झाला. तो मार्क झुकेरबर्ग व फेसबुकवर आधारित आहे.
२२ फेब्रुवारी २०११ रोजी इजिप्तमध्ये एका मुलाचे नाव फेसबुक ठेवण्यात आले, कारण इजिप्तच्या क्रांतीत फेसबुकचा महत्त्वाचा वाटा होता.
— संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Leave a Reply