चीननं अमेरिकेच्या टेबल टेनिस संघाला आमंत्रण देऊन ‘पिंगपाँग डिप्लोमसी’ सुरू केली.
१९७० च्या दशकात चीन आणि अमेरिकेमधील संघर्ष कमी करण्यात मोलाची भूमिका चीनचे टेबल टेनिस टेनिसपटू ‘जुआंग डुंग’ यांनी बजावली होती. त्यांनी घेतलेल्या पावले ‘पिंग पोंग डिप्लोमसी’ म्हणून ओळखली जाते. १९७१ मध्ये जपान माढेल नगोया मध्ये झालेल्या विश्व चैंपियनशिप स्पर्धेच्या दरम्यान अमेरिकी खेळाडू ग्लेन कान यांची बस सुटली तेव्हा चीनच्या टीमने त्यांना आपल्या बसने त्यांना मैदानात पोहचवले होते. पुढे झालेल्या सामन्यात जुआंग डुंग यांनी अमेरिकन क्रीडापटू ग्लेन कान यांना एक सिल्कचे पेंटिंग भेट केले होते. आपल्या दुभाषीच्या मदतीने जुआंग डुंग यांनी ग्लेन कान यांना सांगितले अमेरिकी सरकारचे चीनच्या सोबत दोस्तीचे संबध नाहीत पण अमेरिकन लोक चिनी लोकांचे मित्र आहेत. मी तुम्हाला ही फ्रेम चिनी लोकांच्या कडून दोस्ती खुण म्हणून देत आहे. जेव्हा या दोघांच्या भेटीची बातमी पेपर मध्ये आल्यावर चीनचे नेते माओत्से तुंग यांनी विदेश मंत्रालयाला आदेश दिला की अमेरिकी टीमला चीन बोलवा. माओत्से तुंग यांनी जुआंग डुंग यांचे कौतुक करताना म्हणाले जुआंग डुंग यांना फक्त उत्तम पिंग पोंग कसे खेळावे माहिती नसून डिप्लोमेसी कशी करावी हे पण चांगलं माहिती आहे. त्यापाठोपाठ अमेरिकन संघाने त्याच वर्षी चीनला भेट दिली. १० एप्रिल १९७१ रोजी या ऐतिहासिक भेटीला सुरुवात झाली, जेव्हा १५ अमेरिकन टेबल टेनिसपटू, संघाचे अधिकारी हाँगकाँगहून पूल पार करून चीनला गेले. अमेरिकेची टीम वैविध्यपूर्ण होती, ज्यात हिप्पी ग्लेन कोवान पासून महाविद्यालयाचे प्राध्यापक, अनेकांचा समावेश होता. त्या वेळी अमेरिकेच्या पुरुष संघाचा जगात २४ वा क्रमांक होता.
या अमेरिकन संघाच्या भेटी नंतर १९७२ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनीही चीनला भेट दिली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची कम्युनिस्ट चीनला ही पहिली भेट होती. या दौर्याभमुळे जगातील चीनचे दरवाजे उघडले आणि शीत युद्धाची शंका कमी झाली. जुआंग डुंग तीन वेळा विश्व चैंपियन राहिले होते. ते १९६० च्या दशकातील चीन मोठे खेळाडू होते. पुढे जुआंग डुंग हे खेळ मंत्री राहिले होते, व ते कम्यूनिस्ट पार्टीचे सेंट्रल कमीटीचे सदस्य राहिले होते.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply