गुप्तहेर म्हणजे बॉन्ड.. जेम्स बॉन्ड.. असे समीकरण असणा-या जेम्स बॉन्डच्या चित्रपटांना आज सत्तावन्न वर्षे पूर्ण झाली. जगातल्या जवळपास ५० टक्क्य़ांहून अधिक लोकांनी जेम्स बॉण्ड हे नाव ऐकलेलं आहे. जगातल्या इतर कुठल्याही चित्रपटाला बॉण्डपटांइतकी लोकप्रियता मिळालेली नाही. ब्रिटिश कादंबरीकार इयान फ्लेमिंग यांनी जेम्स बॉन्डच्या पात्राला जन्म दिला आणि पाहता पाहता संपूर्ण जगभरातील सिनेचाहत्यांना बॉन्डपटाचे वेड लागले.
जेम्स बाँड हे इयान फ्लेमिंग ह्यांनी १९५३ साली बनवलेले एक काल्पनिक पात्र आहे. जेम्स बाँड हा एक ब्रिटिश गुप्तहेर असून तो खात्यामध्ये ००७ ह्या सांकेतिक नावाने ओळखला जात असतो. ५ ऑक्टोबर १९६२ साली आलेला ‘डॉक्टर नो’ हा पहिला बॉन्डपट. इयन फ्लेमिंगने बाँडवर ६ कादंबऱ्या व २ लघुकथा लिहिल्या. इयान फ्लेमिंगचा मृत्यू १९६४ मध्ये झाला.
त्यानंतर जेम्स बॉण्ड सीरिजचा पिता म्हणून किंग्जले अमिस यांना ग्लिडरोज पब्लिकेशन या प्रकाशन संस्थेने पाचारण केले. त्यानुसार त्यांनी ‘कर्नल सन’ ही कादंबरी रॉबर्ट मर्खाम या टोपणनावाने लिहिली. पण पुढील कादंबऱ्या स्वत:च्याच नावाने लिहिल्या. त्यानंतर ख्रिस्तोफर वूड, जॉन गार्डनर, रेमंड बेन्सन, सॅबॅस्टियन फॉल्क्स, जेफ्री डेवर, विल्यम बॉयड या सात लेखकांनी बॉण्ड सीरिजमधल्या कादंबऱ्या-कथा लिहिल्या. त्या सर्वावर बॉण्डपट आले. तेही जगभर तुफान गाजले.
या काळात जसा जेम्स बॉण्डचा पिता बदलत गेला. बॉण्ड चित्रपटांत शॉन कानरी, जार्ज लेझांबी, रॉजर मूर, टिमोथी डाल्टन, पिअर्स ब्रॉस्नन आणि डॅनिअल क्रेग जेम्स बाँडची यांनी व्यक्तिरेखा साकारली आहे. चित्रपटांमध्ये हेरगिरी करत शत्रूंच्या नाकी नऊ आणणा-या आणि सुंदर तरूणींना आपल्या चलाखीने, स्मार्ट लूकने वेड लावणा-या बॉन्डची भूमिका साकरणा-या कलाकारांनी ख-या आयुष्यातही जगभरातील तरूणींना घायाळ केले आहे.
जेम्स बाँड नायक असलेले आजवर २४ चित्रपट प्रदर्शित झाले असून सर्वात नवा चित्रपट २०१५ सालचा स्पेक्टर हा होय. हे चित्रपट अत्यंत यशस्वी ठरले असून ते जेम्स बाँडच्या पात्राची स्टाईल, रूबाब तसेच चित्रपटांमधील संगीतासाठी ओळखले जातात. आजवर सहा वेगवेगळ्या सिनेनायकांनी ह्या २४ चित्रपटांमध्ये आजवर जेम्स बाँड शृंखलेमध्ये २४ चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. हे सर्व चित्रपट एऑन प्रॉडक्शन्स ह्या लंडनमधील कंपनीने बनवले आहेत.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply