आज चित्रपटसृष्टीमध्ये सुवर्णयुग घडविणाऱ्या प्रभात फिल्म कंपनीचा ‘माणूस’ हा मराठी चित्रपट ऐंशी वर्षे पूर्ण करीत आहे. सोज्वळतेतून वेश्येच्या जीवनाची व्यथा मांडणाऱ्या ‘माणूस’ने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. तर हिंदीमध्ये ‘आदमी’ नावाने प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे देशभर स्वागत झाले.
द पोलीस कॉन्स्टेबल ही कथा वाचनात आल्यानंतर व्ही. शांताराम यांना या चित्रपटाची संकल्पना सुचली. नायक पोलीस शिपाई, तर नायिका वेश्या. भाबडा, सरळमार्गी पोलीस आणि चाणाक्ष, संसाराची स्वप्ने पाहणारी नायिका. पोलीस तिला सन्मार्गावर आणू इच्छितो अशी कथा घेऊन चित्रपटनिर्मिती हा धाडसी विचार १९३८ मध्ये प्रत्यक्षात आला.
९ सप्टेंबर १९३९ रोजी मुंबईच्या सेंट्रल सिनेमामध्ये माणूस प्रदर्शित झाला या घटनेला आज ८२ वर्षे पूर्ण होत आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन होते व्ही. शांताराम यांचे, कथा होती ए. भास्करराव यांची, संवाद व गीते अनंत काणेकर यांची संगीत कृष्णराव यांचे. ध्वनीलेखन होते शंकरराव दामले यांचे, छायालेखन होते व्ही. अवधूत यांचे, कला दिग्दर्शन होते साहेबमामा फत्तेलाल व यातील कलाकार होते, शाहू मोडक, शांता हुबळीकर, राम मराठे, मंजू, छोटू, बुवासाहेब, गौरी, बाई सुंद्राबाई, मानाजीराव.
या चित्रपटातील ‘आता कशाला उद्याची बात’ या गीताने बहार उडवून दिली. या गीतातील बंगाली कडवे उत्तम व्हावे यासाठी त्यांनी संगीतकार अनिल विश्वास यांना बोलावून घेतले होते.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply