शांत व्हावे, आठवांचे मोहोळ
साठव जागवित काळीज थकले
जगायचे ते सारे जगुनी झाले
भोगण्यासारखे काही न उरले
स्मरणी दिव्यत्वाचे स्पर्श ममत्वी
ते भाग्य कृपाळू जगवित राहिले
ऋतुऋतु भारले दृष्टांत निसर्गी
स्थित्यंतरे सृष्टित घडवित राहिले
भौतिक सुखाला, विटुनी जाता
ध्यास परमार्थाचे जीवास लागले
अंतर्मुख झालो जेंव्हा हॄदयांतरी
सत्यार्थ जीवनाचे उलगडुनी गेले
–वि.ग.सातपुते. (भावकवी)
(9766544908)
रचना क्र. २७४
२८/१०/२०२२
Leave a Reply