आली माऊली विट्ठलाचे भेटी
नाचे परब्रह्म आनंदे वाळवंटी..।।धृ।।
आषाढ़ी कार्तिकी चाले दिंडी
धावते मोदे संतांची पालखी
हरिदास टाळमृदंगे नाचनाचती…।।१।।
तुळसीमाळ गळा गंध कपाळी
मुखे हरीनाम गरजे आसमंती
नेत्री राणा पंढरिचा लागे भेटी…।।२।।
सोहळा सुखाचा चंद्रभागेतीरी
जीवाजीवासंगे गुंतला विठ्ठल
अंतरी उरला केवळ जगजेठी…।।३।।
गाभारी, साक्ष द्वैत अद्वैताची
निष्पाप, गळाभेट वैष्णवांची
रूपडे सावळे नाचते वाळवंटी…।।४।।
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २८७
६/११/२०२२
Leave a Reply