मध्य प्रदेशातील क्षिप्रा नदीच्या काठी उज्जैन येथे श्री महाकालेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे. प्रख्यात कवी बाणभट्ट, कवी कालीदास, शुद्रक, वराहमिहीर यासारख्यांची साहित्य निर्मिती येथेच झाली अशी अख्यायिका आहे. या ज्योतिर्लिंगाची कथा अशी –
एक दूषण नावाचा राक्षस भयंकर उन्मत्त झाला आणि सर्वांना त्रास देऊ लागला. तेव्हा सर्वजण भगवान शंकराला शरण गेले. त्यांच्या विनंतीवरुन भगवान शंकराने तात्काळ त्या राक्षसाला ठार केले. तेव्हा सर्वजणांनी भगवान शिवाला येथेच राहण्याची विनंती केली व शिवानेही भक्तांच्या इच्छेला मान देऊन ज्योतिर्लिंगाच्या स्वरुपात वास्तव्य केले. त्यामुळे शिवाला महाकालेश्वर असे नाव पडले.
मुस्लिमांच्या आक्रमणाची झळ या मंदिरालाही बसलीच १२३५ साली शमशुद्दीन अल्तमशने या मंदिरावर हल्ला करुन तिथले ज्योतिर्लिंग एका कुंडात फेकून दिले. इतकेच नव्हे तर मंदिर तोडून त्या ठिकाणी मशिदही उभी केली. पण पुढे १७३४ मध्ये मराठी सरदार राणोजी शिंदे यांनी पुन्हा मुळ जागी मंदिर उभे केले. व शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली. याच उजैनला अनेक देवालये असून अतिशय धार्मिक असे हे स्थळ आहे.
— मराठीसृष्टी
Leave a Reply