खरं तर प्रत्येकाच एक
विशिष्ठ अस्तित्व असतं
आत्मसन्मान जपताना
जीवनच पणाला लागतं
जगतानाही खरं तर
कुणीच कुणाचच नसतं
सारी नाती व्यवहारिक
हे सर्वत्र जाणवतं असतं
सोबती सुखाचे असतात
दुःखात तसं कुणी नसतं
प्रत्येकाचे संचित वेगळे
प्रारब्ध भोगायच असतं
मन संवेदना सारख्याच
सारं काही सोसणं असतं
काही किती जरी लपवलं
सत्य ! समोर येतच असतं
********
— वि.ग.सातपुते (भावकवी)
(9766544908)
रचना क्र. २९८
१९/११/२०२२
Leave a Reply