सावळा विठ्ठल माझ्या घरी आला.
रखुमाबाई सवे गाभाऱ्यात विसावला…
माझ्या माय बाईची पुण्याई फळा आली.
जणु पंढरपूर अवघी माझ्या घरीच दुमदुमली…
गोजिरे साजिरे ते रुप सुंदर मनोहर.
पाहताच विसरून गेले हे भवसागर…
तू आहेस अनाथांचा नाथ पंढरीनाथ.
शरण आले तुला जोडोनिया दोन्ही हात..
तुम्ही येता दोघेही घर झाले माझे पवित्र मंदिर.
घरच नाही तर माझे मनही झाले पवित्र मंदिर..
सौ कुमुद ढवळेकर
(यंदा वारीला जातांना एका परिचितांना भेटायला गेलेल्या जवळ आम्हाला एक विठ्ठल रखुमाबाईची मूर्ती दिली आहे. आज एकादशीला ती देवघरात ठेवून पुजा केली आहे त्यामुळे मी जणू पंढरपुरात आहे असे वाटले होते.)
KHUP KHUP CHHAN BHAVANA VYAKT KELYAT.